शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांच्याच नावे घेतला पगार

By admin | Updated: August 31, 2014 23:35 IST

जत तालुक्यातील चित्र : युपीएस वाटपात गोलमाल

जयवंत आदाटे - जत -जत पंचायत समिती संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या विभागाच्यावतीने देण्यात येणारा युपीएस (बॅटरी बॅकअप्) ११६ पैकी ५८ ग्रामपंचायतींना देण्यात आला नाही. हे युपीएस संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांच्या घरात आहेत असे समजते. एका युपीएसची किंमत सर्वसाधारणपणे वीस हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे युपीएस वाटपात अकरा लाख साठ हजार रुपयांचा गोलमाल करण्यात आला आहे, अशी चर्चा पं. स. ग्रामपंचायत विभागात दबक्या आवाजात केली जात आहे.संग्राम विभागामार्फत पंचायत समितीसाठी दोन इनव्हर्टर संच आले होते. परंतु ते पं. स.ला देण्यात आले नाहीत. पं. स. मधील प्रत्येक विभागाने स्वखर्चाने इनव्हर्टर बसवून संगणकाचे काम सुरू केले आहे. एक हजार लोकसंख्या असलेल्या गावासाठी एक संगणक डेटा आॅपरेटर नियुक्त करावा, असा शासकीय नियम आहे. परंतु संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी यांनी चार-पाच गावांसाठी एक डेटा आॅपरेटर नियुक्त केला आहे. ग्रामपंचायतीची संपूर्ण कामे हे डेटा आॅपरेटर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन करीत नाहीत. संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकांकडून दफ्तर मागवून घेऊन पंचायत समिती संग्राम कार्यालयात बसूनच काम केले जात आहे. याचा त्रास ग्रामसेवकांना व ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमध्ये डेटा आॅपरेटर म्हणून कोण काम करत आहे, याची माहिती सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना नसते. परंतु त्यांचा मासिक पगार नियमित काढला जात आहे. ग्रामसेवकांनी डेटा आॅपरेटरची मागणी केल्यानंतर, तुमचे दफ्तर येथेच आणा असे त्यांना सांगितले जाते. दफ्तर वेळेत देऊनही डेटा आॅपरेटरची संख्या कमी असल्यामुळे वेळेत माहिती आॅनलाईन अपलोड होत नाही. त्यानंतर अधिकारी ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रार करत आहेत.एका डेटा आॅपरेटरकडे तीन—चार ग्रामपंचायतींची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे जादा कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यांनी जादा काम करण्यास नकार दिला, तर तुमची इतरत्र बदली करतो किंवा तुम्हाला कामावरून कमी करतो, अशी भीती घालून त्यांच्याकडून जादा काम संग्राम तालुका समन्वयक पुकार आवटी करून घेत आहेत. संग्राम विभागात सध्या कार्यरत असलेल्या डेटा आॅपरेटरच्या यादीत पुकार आवटी यांचे जवळचे नातेवाईक असलेल्यांची जादा नावे आहेत. हे नातेवाईक प्रत्यक्ष कामावर येत नाहीत. त्यांचे काम इतर डेटा आॅपरेटरना करावे लागत आहे. परंतु त्यांचा मासिक पगार मात्र पुकार आवटी घेत आहेत. या डेटा आॅपरेटर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास येथील गैरकारभार उजेडात येणार आहे. (उत्तरार्ध)शासनाची फसवणूक...संग्राम विभागाच्यावतीने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला मागील तीन वर्षात संगणक प्रिंटरची शाई, स्टेशनरी, कार्टेज व इतर आवश्यक साहित्य आणि संगणक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परंतु हे सर्व कागदोपत्री काम झाले आहे असे दाखवून त्यावर ग्रामसेवकांची सही घेऊन दरमहा लाखो रुपयांचे बिल काढून महाआॅनलाईन कंपनी व शासनाची फसवणूक जत पं. स. संग्राम विभागाकडून केली जात आहे. एखाद्या ग्रामसेवकाने अशा बनावट बिलावर सही करण्यास नकार दिला, तर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडून पुकार आवटी दबाव आणून त्याला सही करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे काही प्रामाणिक ग्रामसेवकही हतबल होत आहेत. स्थानिक पातळीवरून संग्राम विभागाला पाठीशी घातले जात असल्यामुळे त्यांची भूक जादाच वाढू लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेने त्रयस्थामार्फत या विभागाची चौकशी केल्यास येथील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.