शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर इस्लामपुरात पुन्हा सखींचा जल्लाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : कोरोना महामारीचे संकट हळूहळू निवळत असतानाच, इस्लामपूर व परिसरातील सखी सदस्या गाण्यांच्या तालावर पुन्हा थिरकल्या. ‘लोकमत’ ...

इस्लामपूर : कोरोना महामारीचे संकट हळूहळू निवळत असतानाच, इस्लामपूर व परिसरातील सखी सदस्या गाण्यांच्या तालावर पुन्हा थिरकल्या. ‘लोकमत’ सखी मंच, इस्लामपूर आणि एक्सेल डर्मा स्किन हेअर अ‍ॅन्ड लेजर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात हळदी-कुंकू आणि नवीन क्लिनिकचे उद्घाटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक प्रल्हाद पाटील यांनी गायलेल्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर उपस्थित असलेल्या दोन हजारहून अधिक महिलांनी गाण्यांचा ठेका धरला.

प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, माजी नगराध्यक्षा शारदादेवी पाटील, वारणा व्हॅलीच्या माजी अध्यक्षा जयश्री पाटील, सोना केमिकलच्या संचालिका माधुरी यादव, प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्सच्या संगीता आणि सरिता सूूर्यवंशी, साई ज्वेलर्सच्या अनिता गोंदकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर याच पाहुण्यांच्या हस्ते एक्सेल डर्मा स्किन हेअर अ‍ॅन्ड लेजर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.

सखी सदस्यांना विभाग प्रतिनिधी रूपाली बलुगडे, स्नेहा यादव, पूजा माने, नंदा हुलके, अनुराधा पाटोळे, सविता माने, आसावरी वाळवेकर यांनी हळदी-कुंकू आणि वाण वाटप केले. त्यांना विद्यार्थिनी रोहिणी सूर्यवंशी, सायली सावंत, मयुरी रजपूत यांनी मदत केली. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर डॉ. प्रियांका पाटील यांनी आपल्या क्लिनिकविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांमधून भाग्यवान सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने सोडतीसाठी देण्यात आलेल्या पैठणी आणि साई ज्वेलर्सचे १ ग्रॅम सोन्याचा दागिना मिळण्याचा मान श्वेता केसरे, भाग्यश्री पाटील, वैशाली पाटील, सुधाताई पाटील, संगीता निंबाळकर, रूपाली बलुगडे, संगीता सावंत, स्वाती काटकर, शशिकला कोरे, सुशीला साळुंखे यांना मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली पाटील यांनी केले.

फोटो - १६०२२०२१-आयएसएलएम-सखी मंच न्यूज १ व २

इस्लामपूर येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, माजी नगराध्यक्षा शारदादेवी पाटील, जयश्री पाटील, माधुरी यादव, संगीता आणि सरिता सूर्यवंशी, अनिता गोंदकर यांच्याहस्ते करण्यात आले. दुसऱ्या छायाचित्रात सखी सदस्यांनी केलेली गर्दी.