शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संतांनी मोडली साहित्य निर्मितीची मक्तेदारी

By admin | Updated: January 1, 2015 00:15 IST

सदानंद मोरे : आरग येथे पारिवारिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मालगाव : साहित्य लेखनाची व निर्मितीची विशिष्ट वर्गाकडे असणारी मक्तेदारी मोडून काढण्याचे क्रांतिकारक कार्य संतांनी केले. त्यामुळेच बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.आरग (रा. मिरज) येथे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था व आरग ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित पारिवारिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले की, जाती व्यवस्थेमुळे साहित्य निर्मितीत अधिकार भेद होता. हा अधिकार एका विशिष्ट वर्गाकडेच होता. संतांनी तेराव्या शतकात या एकाधिकारशाहीला आव्हान देत साहित्यनिर्मितीची मक्तेदारी मोडून काढली. या क्रांतिकारक निर्णयामुळेच संत चोखोबा यांच्या रूपाने बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला. काव्यस्फूर्ती ज्या त्या वेळी शब्दरूपात आणली पाहिजे, अन्यथा ती पडद्याआड जाते. संतांच्या नंतर पंडित व शाहिरांनी काव्यरचनेचा प्रयोग केला, परंतु तो संत साहित्यासरखा टिकून राहिला नाही. साहित्य आणि वाचक यांचा सहभाग असल्यानेच संत साहित्य टिकून राहिले. मराठी भाषेचा वारसा संतांकडून आला. त्यांनीच मराठी भाषा घडविली. संत साहित्यावर टीका करणाऱ्या अनेकांना साहित्य निर्मितीसाठी संतांच्या विचाराचा आधार घ्यावा लागला हे वास्तव आहे. महात्मा फुले यांनीही संत साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली. संतांचे विचार आजही समाजापर्यंत पोहचलेले नाहीत. ते संमेलनाच्या माध्यमातून पोहोचविण्याची गरज आहे. आधुनिक साहित्याशी संत साहित्याचा संबंध काय आहे, हे घुमान येथील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांगण्याचा आपला प्रयत्न असेल, असे डॉ. मोरे यांनी शेवटी सांगितले. तुकाराम गायकवाड यांनी स्वागत, तर डॉ. संतोष वाले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सरपंच एस. आर. पाटील, जि. प. सदस्य प्रकाश देसाई, चंद्रकांत बाबर, बी. आर. पाटील उपस्थित होते. प्रा. पूजा अकोडकर, विजय जंगम, शांताराम कांबळे या साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले. (वार्ताहर)आरग येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली असतानाच डॉ. मोरे यांची घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.