विटा : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या सहयोगाने श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, साहित्य, कला विकास मंचच्यावतीने रेणावी (ता. खानापूर) येथे रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असल्याची माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी दिली.पवार म्हणाले की, या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात शिराळा तालुक्यातील पणुंब्रे वारूण येथील वसंत पाटील, शेगाव (ता. जत) येथील लवकुमार मुळे, इस्लामपूर येथील ज्येष्ठ कवयित्री नंदिनी साळुंखे-पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पणुंब्रेचे वसंत पाटील यांचा ‘कविता घटना आधीच्या आणि नंतरच्या’ हा संग्रह प्रसिध्द आहे. साळुंखे-पाटील यांचा ‘किरणांच्या वाटेवर’ हा काव्यसंग्रह ‘मेनका’ व ‘कापला’ हे गझलचे प्रतिनिधिक संग्रह प्रसिध्द झाले आहेत. तसेच लवकुमार मुळे यांचे ‘गुलमोहर, भावमुद्रा, काळजीवेणा’ हे कवितासंग्रह प्रसिध्द आहेतया संमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्याहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात रवी राजमाने यांचे कथाकथन, तर दुपारच्या सत्रात कविसंमेलन होणार आहे. या संमेलनास आतापर्यंत डॉ. मा. ह. साळुंखे, वामन होवाळ, अनुराधा गोरे, प्रा मिलिंद जोशी, वसंत पाटील यांनी उपस्थिती लावली आहे. (वार्ताहर)
रेणावीत ७ रोजी साहित्य संमेलन
By admin | Updated: November 28, 2014 23:50 IST