शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, मराठा समाजाला आरक्षण द्या!

By admin | Updated: September 28, 2016 00:46 IST

मोर्चातील युवतींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठपुराव्याचे आश्वासन

सांगली : मराठा क्रांती मोर्चाची विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होताच दहा मुलींच्या शिष्टमंडळाने सव्वाअकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले़ ‘साहेब, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि कोपर्डी (जि़ अहमदनगर) येथील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या’, अशी मागणी या मुलींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे यावेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात अक्षया पाटील, चैताली घोरपडे, विश्वजा शिंदे, प्रियांका एडके, स्नेहल पवार, किरण कदम, अंकिता मोहिते, सुश्मिता पै, ऋतुजा माने, मोहिनी शिंदे यांचा समावेश होता़ मुलींच्या या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली़ कोपर्डी येथील मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली़ शेखर गायकवाड यांनी शिष्टमंडळातील मुलींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून मागण्या सोडविण्यासाठी निश्चित शासनाकडे प्रयत्न केला जाईल, मागण्यांचे निवेदन तातडीने राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले़ तुमच्या मागण्यांचा शासन गांभीर्याने विचार करेल, असेही आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले़ (प्रतिनिधी)