शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंवर कारवाईच्या समर्थनाचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. शेतकरी चळवळीतील बहुतांश नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचे समर्थन करताना, खोत यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टीची मागणी केली. एकूणच सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील प्रतिक्रियांमधून कारवाईच्या समर्थनाचेच पारडे जड झाल्याचे दिसत आहे.शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलेल्या फुटीरतावाद्यांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. सरकारमध्ये जाऊन मंत्रिपदावर विराजमान होताना शेतकरी चळवळीशी बेईमानी केली तर, त्याची फळे त्यांना भोगावी लागणारच. असाच प्रकार सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत घडल्याने शेतकरी नाराज होते. राजू शेट्टी यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आता त्यांनी संघटनेत लोकांना घेताना तपासून घ्यावे.- बाळासाहेब कुलकर्णी, संस्थापक नेते,शेतकरी संघर्ष परिषद, सांगलीस्वत:च्या हितासाठी संघटना चालविणाºयांचा फुगा आता फुटलेला आहे. हे कधी ना कधी होणार होतेच. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच मुळी तडजोडीच्या राजकारणावर अवलंबून आहे. सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचा मुद्दा हा व्यक्तिगत स्वार्थापोटीच्या भांडणाचा मुद्दा आहे. दोन नेत्यांमधील व्यक्तिगत वादातून ही घटना घडली आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी युती केली. त्यांच्या या युतीचा शेट्टींना कोणताच फायदा झाला नाही. त्यामुळे संघर्षाचा जन्म झाला. आंदोलनेसुद्धा स्वार्थी भावनेने केल्यामुळे आज त्यांच्या संघटनेवर ही वेळ आली आहे. भविष्यातही त्यांना अनेक परिणामांना सामारे जावे लागेल.- संजय कोले, नेते, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)चळवळीवरचा विश्वास : संपुष्टात येईलशरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे म्हणाले की, सदाभाऊंची हकालपट्टी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर, शेतकरी चळवळीची इतकी बदनामी झाली नसती. ज्यावेळी सदाभाऊंवर गंभीर आरोप होत होते, त्यावेळीही कारवाई झाली नाही. या कारवाईबरोबरच राज्य सरकारनेही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. असे लोक जर चळवळीत राहिले, तर शेतकºयांचा चळवळीवरील विश्वास उडून जाईल. सत्तेच्या मोहापायी चळवळीला वेठीस धरण्याचे काम सदाभाऊंकडून घडल्यामुळे आणि अनेकप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानेच ही कारवाई झाली आहे.शेतकरी चळवळीमध्ये धोकादायक माणसं ठेवल्यामुळे चळवळीचे नुकसान होते, याचे सदाभाऊ खोत हे उदाहरण आहे. त्यांच्या संघटनेतून हकालपट्टीच्या निर्णयाला मोठा विलंब झाला. खासदार राजू शेट्टी यांना हा उशिरा सुचलेला शहाणपणा म्हणावा लागेल. चळवळी या शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या जीव असतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे असते. या सर्व घटकांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रेम केले होते, मात्र दोघेही आता एकमेकांशी संघर्ष करून संपून जातील, ही शेतकºयांच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.बी. जी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटनास्वा िभमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोघांचे बोट धरून आम्ही शेतकरी चळवळीत आलो. पुणतांब्याचे शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मोडले. शेतकºयांचे आंदोलन मोडणाºयांबरोबर सदाभाऊ राहणे, ही गोष्टच न रुचणारी होती. त्यामुळे आजचा निर्णय संघटनेला घ्यावा लागला आहे. या गोष्टी घडायला नको होत्या.- विकास देशमुख, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सांगलीस्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कोणताही निर्णय घेत असताना संघटनेअंतर्गत लोकशाहीची पद्धत अवलंबिण्यात येते. त्यानुसार दोन्ही बाजूंनी विचार करून म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊन घेतलेला हा निर्णय आहे. संघटनेत राहायचे असेल, तर प्रत्येक कार्यकर्त्याला धोरणांची, विचारांची चौकट सांभाळावीच लागते.- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना