शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटी रॅकेटकडून ४२ लाखांचा डल्ला

By admin | Updated: December 17, 2015 01:25 IST

सहा विद्यार्थी अडकले : तपास अंतिम टप्प्यात; लवकरच अटक सत्र सुरू होणार

सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका पेपरफुटी प्रकरणात आठ ते दहाजणांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटने पेपर फोडण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून सात ते साडेसात लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात पुढे आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून अटकसत्र सुरू होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा परिषद आरोग्य सेविका परीक्षेतील पेपरफुटीने शासकीय यंत्रणा हादरली आहे. यामागे आठ ते दहा जणांचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सावजाचा शोध घेतला आहे. त्यांच्या जाळ्यात सध्या सहा विद्यार्थी अडकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सात ते साडेसात लाख रुपये रॅकेटने घेतले. त्याबाबतचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेकडून सावध पावले उचलली जात आहेत. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तांत्रिक बाबींची माहितीही पोलिसांनी मागविली आहे. पण त्याबाबत त्यांनी गोपनीयता बाळगली आहे. ही माहिती प्राप्त होताच रॅकेटचा पर्दाफाश केला जाईल, असे उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. पेपर छापल्यापासून ते विद्यार्थ्यांच्या हाती पडेपर्यंतच्या साखळीचा शोध घेतला जात आहे. पेपर कुठे बाहेर पडला, त्याचे वितरण कसे झाले, विद्यार्थ्यांशी संपर्क कसा साधला गेला, याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या रॅकेटमध्ये जिल्हा परिषदेकडील कर्मचारी असून, त्याबाबची अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. येत्या दोन दिवसांत टोळीचे अटकसत्र सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या तरी तपासात कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आलेले नाही. पण पुढील तपासात ज्या कोणाचा पेपरफुटीशी संबंध येईल, त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. या प्रकरणातून कोणाचीही सुटका होणार नाही, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. येत्या एक-दोन दिवसात या प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश होणार आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पेपर फुटीचे प्रकरण कोणा-कोणाला शेकणार, याची चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)