शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसला दणका

By admin | Updated: June 23, 2016 01:09 IST

राष्ट्रवादीला सभापतिपद : मागासवर्गीय समितीत स्नेहल सावंत यांची बाजी; मते फुटली

सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय समिती सभापती निवडीत महापौर व उपमहापौर गटाला बुधवारी बंडखोरांनी दणका दिला. सत्ताधारी काँग्रेसच्या मदनभाऊ तथा महापौर गटातील एक, तर विशाल पाटील तथा उपमहापौर गटातील दोन मते फुटल्याने विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल सावंत यांनी पुन्हा एकदा सभापतिपदी बाजी मारली. सावंत यांना सहा, तर काँग्रेसच्या शेवंता वाघमारे यांना पाच मते मिळाली. ऐनवेळी विशाल पाटील गटाच्या सुरेखा कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. या निवडीनंतर सावंत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मागासवर्गीय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापतिपदासाठी काँग्रेसमधील मदनभाऊ गटाकडून शेवंता वाघमारे, तर विशाल पाटील गटाकडून सुरेखा कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीने विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. उपमहापौर गटाच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मंगळवारी सायंकाळपासून काँग्रेसमधील दोन्ही गटाने संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यासाठी सदस्यांच्या गाठीभेटीही घेण्यात आल्या. सकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. समितीत मदनभाऊ गटाचे तीन, उपमहापौर गटाचे पाच, तर राष्ट्रवादीचे तीन असे संख्याबळ आहे. बुधवारी सकाळी साडेअकराला समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत विशाल पाटील गटाच्या सुरेखा कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कॉँग्रेसच्या शेवंता वाघमारे व राष्ट्रवादीच्या स्नेहल सावंत यांच्यात सरळ लढत झाली. दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने जिल्हाधिकारी गायकवाड यांनी हात उंचावून मतदान घेतले. यावेळी मदनभाऊ गटाचे माजी महापौर विवेक कांबळे व उपमहापौर गटातील बाळासाहेब गोंधळी (स्वाभिमानी आघाडी) व शुभांगी देवमाने (राष्ट्रवादी) यांनी सावंत यांना मतदान केले. यामुळे सावंत यांना सहा, तर वाघमारे यांना पाच मते मिळाली. जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या हस्ते स्नेहल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत दोन्ही गटाला धक्का बसला. मदनभाऊंच्या अपमानाचा बदलागेल्यावर्षी मागासवर्गीय सभापती निवडीत दिवंगत मदनभाऊंनी बाळासाहेब गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा काँग्रेसच्याच सदस्यांनी गोंधळी यांना मतदान न करता त्यांचा पराभव केला. आता तेच सदस्य रिंगणात असल्याने आपण त्यांना मतदान केले नाही. मदनभाऊंना त्रास दिलेल्यांचा बदला घेतला. मी एकटाच त्यांचा खऱ्याअर्थाने समर्थक आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिली, तर ‘स्वाभिमानी’चे नेते गौतम पवार यांनीही गोंधळी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. पवार म्हणाले की, गतवेळी मदनभाऊंशी चर्चा करून गोंधळी यांना उमेदवारी दिली होती. आताच्या काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी तेव्हा गोंधळींना मतदान केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत गोंधळी यांना मतदानाची मुभा दिली होती. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. ज्यांना मतदान केले, तो गटही राष्ट्रवादीत नाराज आहे. शुभांगी देवमाने राष्ट्रवादीच्या नगरसेविका असल्या तरी, सध्या त्या उपमहापौर गटात असल्याचा दावा केला जातो. त्यांनी या गटाच्या उमेदवारांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली होती. प्रत्यक्षात निवडीवेळी देवमाने यांनी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.