शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी!

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

नगराध्यक्ष निवडणूक : नंदकुमार पाटील विरुध्द कृष्णत गायकवाड

विटा : विटा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आ. सदाशिवराव पाटील समर्थक नंदकुमार पाटील व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू नगरसेवक कृष्णत गायकवाड यांच्यात लढत होत आहे. गायकवाड यांनी आज (शनिवारी) अर्ज मागे न घेतल्याने पालिकेत नगराध्यक्ष निवडीच्या माध्यमातून सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी असा संघर्ष पहायला मिळणार आहे. नगराध्यक्षाची निवडणूक येत्या सोमवारी (दि. २१) होत आहे.पालिकेत आ. पाटील यांचे एकेकाळचे विरोधक अशोकराव गायकवाड यांनी पालिका निवडणुकीत आ. पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवून २३ पैकी २० जागा पदरात पाडून घेऊन पालिकेत एकहाती सत्ता मिळविली. आ. पाटील गटाला १५, तर गायकवाड गटाला पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र, गेल्या एक-दोन महिन्यांपासून पालिका सभागृहात आ. पाटील व गायकवाड समर्थक सत्ताधारी गटातच धुसफूस सुरू आहे.आ. पाटील यांनी गायकवाड गटाला नगराध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. त्यापूर्वी नंदकुमार पाटील यांनाही नगराध्यक्ष पदावर संधी देण्याबाबत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या साक्षीने चर्चा झाली होती. त्यामुळे आता रिक्त होणाऱ्या नगराध्यक्षपदावर नंदकुमार पाटील यांची निवड करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला. त्यामुळे गायकवाड समर्थक गटाने कृष्णत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध नगराध्यक्ष निवडीला सुरूंग लावला.विटा नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटातून नंदकुमार पाटील, सुभाष पाटील व गायकवाड समर्थक गटातून कृष्णत गायकवाड या तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिमदिवशी सुभाष पाटील यांनी अर्ज मागे घेतला. गायकवाड समर्थक कृष्णत गायकवाड अर्ज मागे घेतील, अशी चर्चा होती. त्यासाठी पालकमंत्री डॉ. कदम यांनीही मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. परंतु, गायकवाड यांनी अर्ज मागे न घेतल्याने विट्यात नगराध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी असा सामना रंगणार आहे. (वार्ताहर)