शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपनगराध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम

By admin | Updated: October 30, 2016 23:38 IST

इस्लामपूर पालिका : दोघे विकास आघाडीत

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात बरीच खळबळ माजली आहे. उमेदवार निवडीवेळी काहींना बेदखल करण्यात आले. या नाराजीचा विस्फोट म्हणून माजी उपनगराध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांचे समर्थक मुकुंद कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकत विकास आघाडीत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी समर्थक सुरेश हवलदार यांच्या पत्नीस प्रभाग ८ ब मधून विकास आघाडीची उमेदवारी बहाल करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी, राष्ट्रवादीमधील कुरघोडीचे राजकारण व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून विकास आघाडीत प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील, विक्रम पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, बाबा सूर्यवंशी, विजय कुंभार उपस्थित होते. मंत्री खोत यांनी मुकुंद कांबळे यांचे विकास आघाडीत स्वागत केले. ते म्हणाले, मुकुंद कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांना विकास आघाडीत सन्मानाची वागणूक मिळेल. निशिकांत पाटील म्हणाले, मुकुंद कांबळे यांना सर्वतोपरी मदत करू. त्यांना कसलीही अडचण येऊ देणार नाही. ते आमच्या परिवारातील आहेत. त्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊ. (वार्ताहर)