शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भाडे निश्चितीसाठी ‘आरटीओ’ स्थलांतर रेंगाळले..!

By admin | Updated: November 5, 2014 00:06 IST

प्रश्न जागेचा : आता चेंडू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोर्टात; जागा निश्चितीत पुन्हा विघ्न

सचिन लाड - सांगली-येथील आपटा पोलीस चौकीजवळील महापालिकेच्या शाळा क्रमांक आठच्या इमारतीमध्ये उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय होणार असले तरी, भाडे निश्चितीसाठी हा प्रश्न रेंगाळला आहे. शासनाने भाडे निश्चितीचा हा चेंडू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोर्टात ढकलला आहे. या विभागाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये स्वत:च्या व प्रशस्त इमारतीमध्ये आहेत. केवळ सांगलीचेच कार्यालय अडगळीच्या भाड्याच्या जागेत व शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. ते नागरिकांच्या गैरसोयीचेही आहे. गेल्याच आठवड्यात सेवानिवृत्त झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हरिश्चंद्र गडसिंग यांनी कार्यालयाची अवस्था पाहून, कार्यालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र जागा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. सावळी (ता. मिरज) येथील वादग्रस्त जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट बनला आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही जागांचा नाद सोडला होता. गडसिंग यांची सांगलीतील सेवा केवळ चौदा महिन्यांची झाली. या काळात जागेचा प्रश्न मिटावा, कार्यालयाची स्वतंत्र जागा असावी, सर्व कारभार एकाच छताखाली असावा, लोकांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा होती. यासाठी ते कार्यालयास स्वतंत्र जागा मिळविण्याच्या धडपडीत होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले. महिलांसाठी कार्यालयात कोणतीही सुविधा नाही. कोणी लहान मुलांसोबत आले, तर त्यांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालयाची व्यवस्था नाही. माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर व जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती बांधूनही रिकाम्या पडल्या आहेत. यापैकी कोणतीही जागा देण्याची मागणी गडसिंग यांनी केली होती. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने, महापालिकेच्या बंद असलेल्या शाळेची इमारत तरी द्यावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे केली होती. ही शाळेची इमारत साडेचार हजार चौरस फूट आहे. ती कार्यालयासाठी पुरेशी ठरणार असल्याने ती कोणत्याही स्थितीत ताब्यात घेण्यासाठी गडसिंग यांनी प्रयत्न केले. करारपत्रही झाले... महापालिका व आरटीओ यांच्या जागेबाबत करारपत्र झाले आहे. शाळेची ही जागा मिळण्यास शासनाने मंजुरी द्यावी, असा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाडे निश्चित करुन घ्यावे, असेही शासनाने म्हटले आहे. मात्र बांधकाम विभागाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.