शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

नरेंद्र मोदींवर ‘आरएसएस’चा कंट्रोल

By admin | Updated: January 18, 2016 00:36 IST

कुमार सप्तर्षी : देश वाचवायचा असेल, तर नव्याने राजकीय सुरुवात करण्याची गरज

इस्लामपूर : लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मते दिली, ते पंतप्रधान झाले़ मात्र त्यांच्यावर ‘आरएसएस’चा कंट्रोल आहे़ सध्या लोकांना संमोहित करून पुरोगामी विचारांच्या लोकांचे मुडदे पाडले जात आहेत, हे सर्वच राजकीय पक्षांना मोठे आव्हान आहे. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वांनाच नव्याने राजकीय सुरुवात करावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ़ कुमार सप्तर्षी यांनी दिला़ राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘माझे आठवणीतील बापू’ या विषयावर बोलत होते़ याप्रसंगी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि़ प़ अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, विश्वासराव पाटील उपस्थित होते.स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी गोमांस, गोहत्या यासारखे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लोकशाही हवी का वेदशाही हवी? असा सवाल करीत, योगासने करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कमी केले जात आहे, असा आरोप सप्तर्षी यांनी केला़ ते म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी मधल्या दलालांना बाजूला करून थेट विठ्ठलाशी नाते जोडणारी अध्यात्म क्रांती केली़ त्यातून सर्व जातीत संत तयार झाले. आपण ‘राजकीय लाभार्थी’ होऊ नका़ आपले जीवन ‘हंगामी’ आहे, याची सदैव जाणीव ठेवा आणि जेवढ्या गरजा, तेवढेच मिळवा़ मोदींच्या ‘कॉँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा समाचार घेताना ‘महात्मा गांधींनी घालून दिलेला विचार, संस्कृती कशी जाईल? आणि ती गेली तर देश म्हणून आपण एकत्र राहू का? असा सवाल त्यांनी केला़ राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़ पपाली कचरे, प्रा. शामराव पाटील, आबासाहेब देशमुख, विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, बी. एस़ पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, मनोज शिंदे, बी. डी़ पवार, बाबासाहेब मुळीक, किसन जानकर, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, सदाशिव पवार, माणिकदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)साधेपणा भावला...बापूंच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा साधेपणा मला भावला़ त्यांनी आयुष्यभर ‘सामान्य माणसा’चे जीवन सुखी करण्यासाठी अपार कष्ट घेतले, या शब्दात सप्तर्षींनी राजारामबापूंना आदरांजली अर्पण केली.