शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नावावर ५९ हजार कोटींचे कर्ज: रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:28 IST

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते ...

सांगली : शेतकºयांचा कैवारी असल्याचा डांगोरा पिटणाºया भाजप सरकारने शेतकºयांच्या नावावरच सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कर्जाची ही सर्व रक्कम ‘कॉपोर्रेट’ क्षेत्राकडे वळविली आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावावर सरकार कर्ज उचलत असताना, या विषयावर कोणत्याच पक्षाचे आमदार व खासदार काहीच बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्येला सरकारप्रमाणे या देशातील सर्व आमदार, खासदारही तितकेच जबाबदार आहेत. राजकीय पक्ष, आमदार आणि खासदारांचे कॉपोर्रेट क्षेत्राशी लागेबांधे असल्याने ते गप्प आहेत.यासाठी आता शेतकºयांमध्ये जागृती निर्माण करून लवकरच लढा उभा केला जाईल. अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे कृषिमंत्री, अर्थमंत्री व पंतप्रधान मोठ्या आवाजात सांगतात. पण हा सर्व पैसा कॉपोर्रेट क्षेत्राकडे जात आहे. कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीची ही योजना राबविण्यात आली आहे. शेतकºयांच्या बाजूचे कायदे मोडण्याचे काम सरकार करीत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर सर्वत्र अराजकता माजण्याची भीती आहे.बेडग (ता. मिरज) येथील महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस खासगी राष्टÑीयीकृत बँकेतील अधिकारी आहेत. बँकेने कर्ज वसुलीचा तगादा लावल्याने नागगोजे यांनी शेतातच गळफास घेतला. याप्रकरणी संबंधित बँक अधिकाºयावर येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल करावा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, डी. जी. माळी उपस्थित होते....तर सरकारचे तुकडे करूरघुनाथदादा पाटील म्हणाले की, भ्रष्ट साखर कारखानदारांसाठी तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी, अशी भूमिका घेण्याचा उद्योग सुरू आहे. पण याला आमच्या संघटनेचा विरोध राहील. याप्रश्नी मंत्रिमंडळात असलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत गप्प का आहेत? कोणत्याही परिस्थितीत ऊस बिलाचे तुकडे पडू देणार नाही, प्रसंगी सरकार आणि साखर कारखानदारांची घमेंड उतरवली जाईल. एफआरपीचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सरकारचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.