शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

‘नियोजन’साठी मतदानादिवशीच रुसवाफुगवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:04 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी शंभर टक्के मतदान झाले. उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल आता बुधवारी, ६ सप्टेंबरला लागणार आहे.

ठळक मुद्दे शंभर टक्के मतदान : नेत्यांची धावाधाव; उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला पुन्हा मतांचे गणित बांधण्यात आले. पुरुष गटातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात शेवटच्या टप्प्यात दोन्ही राखीव सदस्यांना मतदानास पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी शंभर टक्के मतदान झाले. उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल आता बुधवारी, ६ सप्टेंबरला लागणार आहे. मोठ्या पक्षांची आघाडी होऊनही मतदानादिवशी अनेकांनी बंडाचे हत्यार वापरल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावाधाव झाली. दुपारपर्यंत रुसवाफुगवीचा खेळ रंगला होता.

जिल्हा नियोजन समितीच्या १३ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. जिल्हा परिषदेच्याच पुरुष व महिला गटातील जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. भाजप, शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी या मोठ्या पक्षांनी बंडखोरांना रोखण्यासाठी व मतांचे क्लिष्ट गणित सोडविण्यासाठी आघाडी केली. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांना व सदस्यांना मतदानादिवशी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर एकत्र बोलावले. जिल्हा परिषद सदस्यांना मतदान कसे करायचे, याबाबतचे प्रशिक्षण सर्वपक्षीय नेत्यांनी दिले. प्रशिक्षण सुरू असतानाच रुसवाफुगवीचा खेळ रंगला. सुरुवातीला विशाल पाटील गट, अजितराव घोरपडे गट नाराज दिसत होते; मात्र नंतर भाजपच्याच गोपीचंद पडळकर गटाने बंडाचा इशारा दिला. त्यानंतर सत्ताधारी नेत्यांची धावपळ सुरू झाली.

गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या एका उमेदवाराला संधी देण्यासाठी कडेगावमधील भाजपच्या एका पॅनेलमधील सदस्याला थांबविण्यात आले. या तडजोडीसाठी तब्बल तासभर चर्चा रंगली. शेवटी पडळकर गटाने आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पडळकर गटाचा रुसवा निघाला नसता, तर विशाल पाटील गट, घोरपडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आघाडी होऊन भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव होण्याची चिन्हे होती. त्यामुळेच भाजप नेत्यांची ऐनवेळी पळापळ झाली.

विशाल पाटील आणि अजितराव घोरपडे गटाचे सदस्यही नंतर अध्यक्षांच्या बंगल्यावर एकत्र आले. तरीही त्यांच्यातील रुसवा कायम असल्याचे दिसत होते. सर्वच सदस्यांना प्रशिक्षण देणाºया नेत्यांनी सुषमा पाटील, विशाल चौगुले यांना मतदानासाठी कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला. विशाल पाटील, घोरपडे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या एकूण तीन सदस्यांच्या मतदानाकडे सर्वपक्षीय आघाडीने दुर्लक्ष केले. सत्ताधाºयांच्याच एका महिला सदस्याचा मतदानावेळी गोंधळ दिसत होता. प्रशिक्षण देऊनही त्यांना मतदान कसे करायचे, हे कळाले नाही. त्यामुळे त्या मताचीही वजावट सर्वपक्षीय आघाडीने केली. त्यानुसार पुन्हा मतांचे गणित बांधण्यात आले.अशी झाली मतांची गोळाबेरीज...अध्यक्ष बंगल्यावर विशाल पाटील गटाचे विशाल चौगुले आणि मनीषा पाटील उपस्थित होते. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वगळून ५७ सदस्यांचे गणित मांडले होते. विशाल पाटील गटाच्या सदस्यांना मतदान करण्याबाबत कोणत्याही सूचना आघाडीच्या नेत्यांना दिल्या नाहीत. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकमेव सदस्या सुरेखा आडमुठे आघाडीच्या बैठकीकडे फिरकल्याच नाहीत. स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी आणि विशाल पाटील यांच्याकडून सदस्य फोडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करण्यात आला. ५७ पैकी दोन सदस्यांना राखीव म्हणून बाजूला ठेवले होते. ५५ मतांपैकी एका महिला सदस्याचा मतदानावेळी गोंधळ झाला होता. त्यांना मतदान प्रक्रियाच कळली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दोन्ही राखीव सदस्यांना मतदानास पाचारण करण्यात आले.राष्ट्रवादी सदस्य नाराजनियोजन समितीसाठी दिलेल्या उमेदवारांवरुन तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाराज होते. मतदानादिवशी काही सदस्यांचे मोबाईल ‘स्वीच आॅफ’ झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आघाडीतील नेत्यांनी केला. मतदान केंद्रावर जाईपर्यंत राष्ट्रवादीचे संबंधित सदस्य नाराजच होते. त्यामुळे त्यांनी आघाडीला मतदान केले का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.ऐनवेळी उमेदवारी बदललीमहिला गटातून कडेगाव तालुक्यातील रेखा साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आटपाडीतील गोपीचंद पडळकर गटाच्या वंदना गायकवाड इच्छुक होत्या, त्यांचा अर्जही राहिला होता. गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने पडळकर गटाने बंडाचे निशाण फडकविले होते. भाजपची मते फुटणार असल्याने, एक जागा अडचणीत आली. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांनी स्वत:च्या तालुक्यातील साळुंखे यांची उमेदवारी रद्द करुन गायकवाड यांना संधी दिली.उद्या होणार मतमोजणीजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी गेला महिनाभर राजकीय खेळ्या रंगल्या होत्या. मतदानाच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असला तरी, सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. राजवाड्यातील जुन्या अल्पबचत सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रप्रमुख म्हणून तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. येथील केंद्रावर एकूण पाच कर्मचारी कार्यरत होते. दुपारी दीड ते अडीच या वेळेत सर्व मतदान पूर्ण झाले. एकूण २७ जागांसाठी निवडणूक होणार होती. यातील १४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता १३ जागांसाठी निवडणूक लागली आहे. या सर्व जागा जिल्हा परिषदेतील महिला व पुरुष खुल्या प्रवर्गातील आहेत. सर्वसाधारण महिला गटातील ७ जागा आहेत; मात्र त्यासाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. पुरुष गटातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.सर्व नेते एकाच मांडवाखालीनियोजन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांचे नेते एकाच मांडवाखाली आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘वसंत’ बंगल्याबाहेर मांडव घालण्यात आला होता. याठिकाणी आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, आ. सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, मकरंद देशपांडे, गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, सत्यजित देशमुख, डी. के. पाटील, सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे मतांचे नियोजन केले.