शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात एकरातील पपईवर फिरविला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:45 IST

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे ...

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे कारण देऊन घेण्यास नकार दिला. अन्य कोणत्याही ठिकाणी खरेदीदार न मिळाल्याने नाराज होऊन शेतकºयाने ती पपई रस्त्यावर फेकून दिली. नैराश्येतून या शेतकºयाने१ एकरातील उर्वरित पपईच्या पिकावर रोटर फिरवून सर्व पीकच जमीनदोस्त केले.कासेगाव येथील विश्वनाथ बाबूराव वगरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी कर्ज काढून शिदाचा माळ येथील एक एकर शेतजमिनीत पपईची लागवड केली होती. मोठ्या कष्टाने त्यांनी पपईची बाग जोमाने पिकवली होती. त्यासाठी लागवड, पाणी, औषधे, मजूर यासाठी सुमारे१ लाखापेक्षा जास्त खर्च केला होता. त्यामुळे फळधारणाही चांगली झाली होती.मुंबई, पुणेच्या बाजारपेठेत पपईला मागणी व दरही चांगला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पपई तोडणीस त्यांनी सुरुवात केली होती. मात्र अचानक बाजारपेठेत पपईचा दर खूपच कमी झाला. पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही मिळत नसल्याने त्यांनी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील स्थानिक व्यापाऱ्यांना २ रुपये किलो दराने ६ टन पपईची विक्री केली. चार दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला विचारून पपईची तोडणी केली. ४ टन पपई संबंधित व्यापाºयाला पाठविल्या. मात्र जास्त मालाची आवक झाल्याचे कारण देऊन त्याने तो माल उतरवून घेण्यास नकार दिला. शेतकºयाने वारंवार विनंती करूनही तो माल व्यापाºयाने खरेदी केला नाही.त्यानंतर विश्वनाथ वगरे यांनी इतर ठिकाणी कोणी व्यापारी हा माल घेते का ते पाहिले. पण स्थानिक कोणीच घ्यायला तयार नव्हते. मुंबई, पुणे येथील वाहतूक खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने, तिकडे पपई पाठवून तोटाच होणार हे लक्षात आले. या सर्व नैराश्येतून भरलेली पपईची गाडी वगरे यांनी कासेगावात आणली आणि सर्व पपई रस्त्यावर ओतल्या. एवढेच नव्हे, तर एक एकरातील सर्व पपईची झाडे रोटरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. सरकारने कर्जमाफी दिली, मात्र, शेतकºयांच्या मालाला हमीभाव दिला नसल्यानेच, अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.