शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार विमा मंडळाकडून लूट

By admin | Updated: March 2, 2016 23:53 IST

सतीश मालू : मिशन, भारती रुग्णालयांशी करार करण्याची मागणी

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीसह लगतच्या औद्योगिक क्षेत्रातून राज्य कामगार विमा महामंडळ (इएसआयसी) महिन्याला एक कोटीहून अधिक रकमेची वसुली करते. त्याप्रमाणात कामगार व आस्थापनांना सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे हे महामंडळ म्हणजे केवळ लूटमार कंपनी बनली असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांनी आता मिशन आणि भारती हॉस्पिटलमधून मेडिकल सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले.कामगार विमा महामंडळाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त चेंबरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओपन हाऊस सुविधा समागम’ या उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव पाटील, सचिव चंद्रकांत पाटील, राज्य कामगार विमा महामंडळाचे उपसंचालक निश्चलकुमार नाग, उपसंचालक पी. जी. कांबळे प्रमुख उपस्थित होते. मालू म्हणाले की, सद्य:स्थितीत उद्योगाशी निगडीत सर्व विभागांचे धोरण बदलले आहे, मात्र कामगार विमा महामंडळाचा दृष्टिकोन अजूनही बदलला नाही. कामगारांच्या जिवावर पगार मिळतो. त्या कामगारांना महामंडळाच्या रुग्णालयात गेल्यावर वाईट वागणूक मिळते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यपध्दती बदलावी. शिवाजीराव पाटील म्हणाले की, महामंंडळाने हुकूमशाहीचे धोरण बंद करावे. कामगारांकडून उपचारापूर्वी पैसे घेतले जातात. मंडळाने प्रथम खासगी रुग्णालयांशी झालेले करार रद्द करावेत. त्यांनी मिशन किंवा भारतीरुग्णालयाशी करार करावेत. यापूर्वी पैसे न दिल्यामुळे करार रद्द झाला, ही मंडळाची चूक होती. त्यांनी पैसे वेळेवर दिले असते, तर मिशन रुग्णालयाने स्वत:हून त्यांच्याशी संपर्क साधला असता. चेंबरचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी त्वरित कुपवाड एमआयडीसीमध्ये बाह्यरु ग्णविभाग (ओपीडी) सुरू करण्याची मागणी केली. मंडळाचे उपसंचालक नाग व कांबळे यांनी मंडळाने दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात केली असल्याचे मत व्यक्त केले. आर. आय. इनामदार, जावेद मणेर, सदाशिव साखरे यांनीही नाराजी व्यक्त केली. इएसआयसी सांगलीचे व्यवस्थापक रामकरण यांनी स्वागत केले. कृष्णा व्हॅलीचे व्यवस्थापक बी. एस. सूर्यवंशी यांनी आभार मानले. सुंदरलाल, हरिभाऊ गुरव, अ‍ॅड. गणेश पाटील, दीपक पाटील, अमित पाटील, दत्ता लोकरे, सचिन गोंधळे, बी. एम. इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर)ओपीडीबाबत दिशाभूलकृष्णा व्हॅली चेंबरने कुपवाडमधून मिरजेला स्थलांतरित करण्यात आलेली इएसआयसीची ओपीडी एमआयडीसीमध्ये सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही जागा योग्य नसल्याचे अभिप्राय पाठविल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर चेंबर आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त करून उच्च अधिकाऱ्यांसमोरच दिशाभूल कशी करता, असा सवाल उपस्थित केला. यावेळी नाग यांनी त्वरित अनुकूल अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.