शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लबाडाकडून खोटेच आश्वासन मिळणार !

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

संजय पाटील : आटपाडीत गृहमंत्र्यांवर केली टीका

आटपाडी : काल (शनिवारी) आटपाडीत येऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी धनगर समाजाला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच न्याय देईल, असे आश्वासन दिले. मात्र धनगर समाजाने आश्वासनाला बळी पडू नये. कारण एका लबाड माणसाने दिलेले हे लबाड आश्वासन आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी येथे केली.येथील तहसील कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून गोपीचंद पडळकर युवा मंचच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी येऊन खा. पाटील यांनी कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ते म्हणाले की, धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत. आर. आर. पाटील यांच्या आश्वासनाला भुलू नका. खोट्या आश्वासनाने तुम्ही भुलणार नाही, हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी म्हणाले की, धनगर समाजाने सनदशीर मार्गाने अनुसूचित जमातीत समावेशासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र असंवेदनशील सरकारने याची दखल घेतलेली नाही. आता आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. यावेळी खासदार पाटील यांच्या विनंतीवरून कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. जयवंत सरगर, विनोद गोसावी, मंथन मेटकरी, अनिल म. बाबर, धुळा देवडकर, महादेव मासाळ, मोहन पडळकर, संजय यमगर, आबा मंडले, शिवाजी माने, शिवराम मासाळ, प्रकाश मरगळे उपस्थित होते. (वार्ताहर)