शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराच्या आंदोलनात मनसे रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

मुंबईत बैठक : रघुनाथ पाटील- राज ठाकरे भेटीत निर्वाळा

इस्लामपूर : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी मुंबईतून भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना दिली. आज सकाळी ११ वाजता मुंबई (दादर) येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरे व शेतकरी संघटनेचे नेते व देशव्यापी ‘सिफा’ संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची भेट झाली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीतील चर्चेत राज ठाकरे यांना पाटील यांनी राज्यातील साखर कारखानदारी, उसाची शेती आणि ऊसदराचे आंदोलन याची सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली. राज ठाकरे यांनी राज्यातील साखरसम्राट व शासनाकडून होणाऱ्या अन्यायाबाबत संताप व्यक्त करुन दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे. शासनाची व कारखानदारांची निमंत्रणे झुगारुन दिली पाहिजेत. उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी २0 टक्के साखर जनतेसाठी तर ८0 टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.सुमारे तासाभराच्या या बैठकीत ठाकरे यांनी यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, असेही त्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले. या चर्चेवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कार्यालयीन चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)वसगडेच्या कार्यक्रमाला राज ठाकरे येणारयेत्या ११ नोव्हेंबर रोजी वसगडे (जि. सांगली) येथे ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराने धारातिर्थी पडलेल्या चंद्रकांत नलवडे यांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेला उपस्थित राहण्याचेही राज ठाकरे यांनी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे.ऊसाला योग्य दर दिलाच पाहिजे