शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भिवघाटमध्ये किसान सभेकडून रास्ता रोको;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST

विटा : केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ...

विटा : केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी भिवघाट (ता. खानापूर) येथे राष्ट्रीय महामार्गावर किसान सभेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या फलकाची होळी करुन निषेध केला.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यानंतर मोदी सरकारचा निषेध करीत केंद्र सरकारच्या फलकाची आंदोलकांनी होळी केली.

यावेळी जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले, केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाचा वापर करून दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र केंद्राच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान सभेने पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनात जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, दौलत भगत, महानंदा हसबे, जयराम जाधव, रविकांत जाधव, शिवाजी यादव, संतोष यादव, राजाराम माने आदी उपस्थित होते.

फोटो - ०३१२२०२०-विटा-किसान सभा :

शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ भिवघाट येथे गुरुवारी किसान सभेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या फलकाची होळी केली.