फोटो
संख : जत येथील के.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एम. सय्यद (वय ५५) यांचे निधन झाले. ते १९ वर्षे सहशिक्षक व पाच वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या कनिष्ठ महाविद्यालयात ते अध्यापन करीत होते. त्यांचे मूळ गाव गिरगाव (ता. जत) असून शारीरिक शिक्षणातील विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. शांत, संयमी, मनमिळाऊ व्यक्तिमत्वाच्या सय्यद यांचे अनेक विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात चमकले आहेत. त्यांना २०१८ चा विलासराव देशमुख राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार, २०१७ मध्ये अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचा आदर्श क्रीडा पुरस्कार मिळाला होता. ते सांगली जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, क्रीडासंकुल समिती जतचे सक्रिय सदस्य होते. जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक महंमदनिसार सय्यद यांचे ते पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, विवाहित मुलगी, दोन भाऊ, भावजयी, पुतण्या, चुलते असा परिवार आहे.