शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

By admin | Updated: September 1, 2014 23:57 IST

महावितरणचे दुर्लक्ष : ३0 वर्षांत गेला ६ जणांचा बळी

मानाजी धुमाळ -रेठरेधरण -रेठरेधरण, धुमाळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांना जणू विद्युततारांचा शाप असून, गेल्या ३0 वर्षात ६ जणांचा बळी गेला आहे.रेठरेधरण, धुमाळवाडी परिसरातून २६0 व्होल्ट व ४६0 व्होल्टच्या विद्युततारांचे जाळे विणले असून धुमाळवाडी परिसरातून विद्युत वितरणचे मोठे टॉवर आहेत. त्यातच विद्युत वितरण तारा या धोकादायक असल्याने जमिनीपासून किमान २0 फूट उंचीवर असणे गरजेचे असताना, वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्याने, झाडे पडून तारांचा ताण ढिला झाल्याने तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर झुकलेल्या असतात. काही ठिकाणी तर तारा तुटून पडतात. या तारांचा शॉक बसून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.१९९0 च्या दरम्यान धुमाळवाडी डोंगरावर मोठ्या टॉवरच्या तारा जमिनीपासून पंधरा फुटावर होत्या. त्यावेळी शाळकरी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय जाधव (वय १३) व प्रताप सखाराम धुमाळ (१३) यांनी खेळण्याच्या नादात तारेवर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे तारेजवळ मोठा स्फोट होऊन त्यांना भाजल्याने या दोन्ही मुलांना प्राण गमवावा लागला होता.१९८0 च्या दशकात रेठरेधरण येथील लेंढूरी ओढ्यानजीक असणाऱ्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग चंद्रू पाटील यांचा मृत्यू झाला होता. तसेच रेठरेधरण-शिराळा रोडनजीक असलेल्या डी. पी.ची दुरुस्ती करण्यासाठी पोलवर चढलेले वायरमन जमादार यांना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.२00२ मध्ये सर्जेराव रंगराव पाटील या शेतकऱ्याचा शेतातील उसात तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता, तर असाच प्रकार ४ आॅगस्ट २0१४ रोजी घडला. यामध्ये सांगलीच्या अग्निशमन दलातील कर्मचारी तुकाराम उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उठत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज...आतापर्यंत रेठरेधरण व धुमाळवाडी या दोन गावातील ६ जणांना शॉक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व घटना अंगावर शहारा आणणाऱ्या असून, वीज वितरण कंपनीने यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तारा खाली लोंबकळत आहेत, त्यांचा वेळीच ताण काढणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतातून तारा गेल्या आहेत, तेथील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.