शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरण, धुमाळवाडीकरांना विजेच्या तारांचा शापच..!

By admin | Updated: September 1, 2014 23:09 IST

महावितरणचे दुर्लक्ष : ३0 वर्षांत गेला ६ जणांचा बळी

मानाजी धुमाळ - रेठरेधरण -रेठरेधरण, धुमाळवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांना जणू विद्युततारांचा शाप असून, गेल्या ३0 वर्षात ६ जणांचा बळी गेला आहे.रेठरेधरण, धुमाळवाडी परिसरातून २६0 व्होल्ट व ४६0 व्होल्टच्या विद्युततारांचे जाळे विणले असून धुमाळवाडी परिसरातून विद्युत वितरणचे मोठे टॉवर आहेत. त्यातच विद्युत वितरण तारा या धोकादायक असल्याने जमिनीपासून किमान २0 फूट उंचीवर असणे गरजेचे असताना, वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्याने, झाडे पडून तारांचा ताण ढिला झाल्याने तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर झुकलेल्या असतात. काही ठिकाणी तर तारा तुटून पडतात. या तारांचा शॉक बसून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.१९९0 च्या दरम्यान धुमाळवाडी डोंगरावर मोठ्या टॉवरच्या तारा जमिनीपासून पंधरा फुटावर होत्या. त्यावेळी शाळकरी विद्यार्थी प्रकाश दत्तात्रय जाधव (वय १३) व प्रताप सखाराम धुमाळ (१३) यांनी खेळण्याच्या नादात तारेवर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे तारेजवळ मोठा स्फोट होऊन त्यांना भाजल्याने या दोन्ही मुलांना प्राण गमवावा लागला होता.१९८0 च्या दशकात रेठरेधरण येथील लेंढूरी ओढ्यानजीक असणाऱ्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पांडुरंग चंद्रू पाटील यांचा मृत्यू झाला होता. तसेच रेठरेधरण-शिराळा रोडनजीक असलेल्या डी. पी.ची दुरुस्ती करण्यासाठी पोलवर चढलेले वायरमन जमादार यांना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.२00२ मध्ये सर्जेराव रंगराव पाटील या शेतकऱ्याचा शेतातील उसात तुटून पडलेल्या विद्युत तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता, तर असाच प्रकार ४ आॅगस्ट २0१४ रोजी घडला. यामध्ये सांगलीच्या अग्निशमन दलातील कर्मचारी तुकाराम उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उठत आहे.