शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘तिळगंगा’चे पुनरुज्जीवन लोकसहभागातूनच पूर्ण

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

राजू शेट्टी : परिसरातील पाणी प्रश्न सुटणार, नदीतील पाण्याचे पूजन

पेठ : शासनाकडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पेठ येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही शासनाने मोठी मदत केली आहे. तसेच याला लोकसहभागाची साथ मिळाल्याने कमी कालावधित लाखमोलाचे काम झाले आहे. तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे भविष्यातील पाणी टंचाई मिटली आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीतील पाण्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, नायब तहसीलदार शैलजा पाटील, सरपंच श्रीमती सुनीता पवार, संपतराव पवार, प्रा. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, जलशिवार योजनेंतर्गत ग्रामप्रकाश शिवराज्य संस्थेच्या माध्यमातून तिळगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. आगामी काळात ही नदी बारमाही वाहू लागेल.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार आहे.प्रारंभी पं. स. सदस्य प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, अ‍ॅड. एस. यु. संदे, डॉ. सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यशवंत ग्लुकोजचे संचालक संदीप पाटील, शांताराम देशमाने, विलास चौथाई, मंडल अधिकारी गोपी वडर, तलाठी टी. आर. काळे, नीता भोसले, राहुल पाटील, शेख, विलास पाटील, श्रीरंग कदम, रमेश कदम, धुळाप्पा जानकर उपस्थित होते. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)समन्वय : कृतीचाशासन, लोकसहभाग, प्रशासन यांच्यातील समन्वयामुळेच आपण कितीही मोठे काम सहजपणे करू शकतो, हेच तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवन कामावरून स्पष्ट झाले आहे. यापुढेही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.