चिंचवड रेल्वे स्थानकातून १०३ मालगाड्यांच्या २५६४ वॅगन देशाच्या विविध भागांत व ११ मालगाड्या बांगलादेशात बेनापोल येथे पाठविण्यात आल्या. यासोबतच १७५ मालगाड्यांच्या ७३६२ वॅगनमधून ४ लाख ६६ हजार टन साखरेची वाहतूक करण्यात आली. वर्षभरात १७१ वॅगनद्वारे ११,४८२ टन खते पाठविण्यात आली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस मार्च महिन्यात ३१४८ वॅगनद्वारे मालाचे लोडिंग होऊन सर्वाधिक २३ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या व्यवसाय विकास युनिटची निर्मिती करण्यात आली. वाणिज्य व परिचालन विभागाच्या या पथकाच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर रेल्वेला नवीन ग्राहक मिळाले. यामुळे ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १२५ टक्के व खते वाहतुकीत ३४४ टक्के वार्षिक वाढ झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे रेल्वे विभागास १३ लाख टन मालवाहतुकीद्धारे १३० कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST