शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला फौजदाराची बदली

By admin | Updated: November 7, 2014 23:44 IST

अखेर उचलबांगडी : अधिकाऱ्याला हलविले

सांगली : लाचप्रकरणी अटक झालेल्या जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस फौजदार सीमा आघाव यांची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली. ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक पी. एम. कदम यांचीही मुख्यालयाकडे बदली केली आहे. आर. ई. शेख यांच्याकडे जतचा कार्यभार सोपविला आहे.बिळूर (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी झाली होती. याप्रकरणी परस्पराविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती. याचा तपास आघाव यांच्याकडे होता. यातील एका फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीतील संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास आघाव टाळाटाळ करीत होत्या. यासाठी त्यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती. फिर्यादीने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने सापळा लावला होता. फिर्यादीकडून लाच घेण्यास आघाव यांनी नकार दिला. ती त्यांनी त्यांचा पती दत्ता बडे याच्याकडे देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारताच दोघांनाही पकडले होते.लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, अहवाल येताच आघाव यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. त्यांच्याविषयी तक्रारी होत्या. त्यांना एक-दोन वेळा कामात सुधारणा करण्याची ताकीद दिली होती. ठाण्याचे अधिकारी कदम यांनाही सुनावले होते. मात्र तरीही त्यांच्या कामात बदल झाला नाही. यामुळे दोघांच्याही मुख्यालयात बदल्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)पोलीस दलास हादरालाचलुचपत विभागाकडून लाचखोरांना पकडण्याची होत असलेली कारवाई नजरेत भरण्यासारखी आहे. मात्र त्यांच्या जाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सापडण्याचे प्रमाण मोठे असल्याने, पोलीस दलाच्यादृष्टीने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. विट्यातील हवालदार महादेव खोत याच्या अटकेनंतर दुसऱ्याचदिवशी सीमा आघाव लाच घेताना सापडल्याने पोलीस दलास हादरा बसला आहे.