शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य मका बियाणे कंपनीकडे परत

By admin | Updated: June 28, 2015 00:33 IST

जमदाडे यांची माहिती : प्रयोगशाळेत होणार साठ्याची तपासणी, तणनाशकाच्या चौकशीचे आदेश

सांगली : जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे वाटप आता थांबवण्यात आले असून, शिल्लक असलेले सुमारे शंभरहून अधिक क्विंटल बियाणे परत कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. तणनाशक वाटपाच्या सखोल चौकशीचेही आदेश दिले असून, चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिला आहे. तासगाव तालुक्यामध्ये मागीलवर्षी आलेल्या व कालबाह्य झालेल्या बियाणांची विक्री झाली. त्याचबरोबर गेल्यावर्षी मोफत वाटलेल्या तणनाशकासाठी यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचा उद्योगही खुलेआम कृषी विभागात सुरू झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर याची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली. याबाबत कृषी अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकही झाली. तासगाव तालुक्यात महाबीज कंपनीचे ९ क्विंटल मका बियाणे शिल्लक असून, जिल्ह्यात सुमारे शंभर क्विंटल बियाणे शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे. हे बियाणे आता महाबीज कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहे. तसे आदेशही कंपनीला देण्यात आल्याची माहिती जमदाडे यांनी दिली. या बियाणांसोबतच ‘अट्रानेक्स’ या नावाचे अर्धा किलोचे तणनाशक मोफत देण्यात आले होते; मात्र त्याची शंभर रुपयाला विक्री करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी होत असून याबाबचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले मका बियाणे १८ एप्रिल २०१५ रोजीच कालबाह्य झाले आहे. तासगाव तालुक्यात ६६ हेक्टरवर सध्या मका बियाणांची पेरणी झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर कालबाह्य झालेली बियाणे आहेत. मुदत संपलेल्या मका बियाणांचा आणि मोफत असूनदेखील तणनाशकाची पैसे घेऊन विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागात सुुरू होता. ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्तानंतर याचे वितरणही तात्काळ थांबवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)