शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारशेवर कर्मचारी निवृत्त

By admin | Updated: June 1, 2016 00:57 IST

एक जून जन्मतारीख : शासकीय कार्यालयात कामाचा ताण वाढणार

सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक क्षण म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. जिल्ह्यात दि. ३१ मे रोजी (मंगळवार) तब्बल चारशेहून अधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पूर्वी कुटुंबात जन्मतारखेच्या नोंदी ठेवण्याची पध्दत नसल्याने किंवा निरक्षणपणामुळे अनेकांना लागलेल्या ‘सरकारी’ एक जून या जन्म दिनांकामुळेच ३१ मे या एकाचदिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विलास डुबल, महापालिकेचे उपायुक्त सी. बी. चौधरी, उद्योग भवनचे महाव्यवस्थापक कांबळे यांचा समावेश आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती हा मोठा समाधानाचा क्षण असतो. नेहमीच फायलींच्या गराड्यात राहिलेल्यांना यामुळे कायमची उसंत मिळत असते, तर अनेकजण आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ सुरू करत असतात. वर्षभर सेवानिवृत्तीची प्रक्रिया सुरूच रहात असली तरी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या मात्र नेहमीच मोठी असते. यंदाही जिल्ह्यातील विविध विभागातील चारशेहून अधिक कर्मचारी निवृत्ती घेत आहेत. यात सर्वाधिक प्राथमिक शिक्षकांचे प्रमाण असून, त्यानंतर एसटीचे कर्मचारी, वीज वितरण कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पूर्वी जन्मदिनांक लिहून ठेवली जात नसे. त्यात सर्वसामान्य घरांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण असल्याने जन्म तारखेचे भविष्यकालीन महत्त्व माहीत नसल्याने कदाचित अंदाजे तारखेवरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात असे. यातही जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने त्याकाळी बहुतांशजणांची जन्मतारीख १ जूनच शाळा दप्तरी लागली आहे. यामुळेच ३१ मे रोजी निवृत्तीचे प्रमाण अधिक आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये एसटीचे १०५ कर्मचारी निवृत्त होत असून, यात ३२ चालक, २२ वाहक, १६ कार्यशाळा कर्मचारी आणि ३५ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा आहेत. जिल्हा परिषदेचे ८९ कर्मचारी निवृत्त होत असून, यात शिक्षणच्या सर्वाधिक ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधील १४ कर्मचारी निवृत्त झाले असून, त्यात दोन नायब तहसीलदार, १० मंडल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेचेही १८ कर्मचारी निवृत्त झाले असून, त्यात उपायुक्तांसह लिपिक, घरपट्टी, पाणी पुरवठासह ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात वर्ग चारच्या ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी विविध विभागात सत्कार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)महापालिकेची ६२६ पदे रिक्तसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत एकूण २ हजार ३७७ पदे मंजूर आहेत. यापैकी ६0८ पदे यापूर्वी रिक्त होती. या १८ रिक्त पदांमुळे आता ही संख्या ६२६ वर गेली आहे. महापालिकेत सध्या १ हजार ७५१ जण कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या वाढत असल्याने दिवसेंदिवस प्रत्येक विभागात कामाचा ताण वाढत आहे. निवृत्त झालेल्या १८ कर्मचाऱ्यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या सभागृहात आयुक्त अजिज कारचे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, नगरसेविका संगीता खोत, माजी नगरसेवक वि. द. बर्वे उपस्थित होते.