शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरणच्या सचिनने ‘आयुष’ला दिले ‘आयुष्य’

By admin | Updated: November 20, 2015 00:19 IST

रात्रीची घटना : आडात पडूनही जीवदान

मानाजी धुमाळ --रेठरेधरण (ता. वाळवा) येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे असणाऱ्या गोरक्षनाथ आडामध्ये रात्रीच्या वेळेस खेळताना पडलेल्या आयुष कैलास शेटे (वय ५ वर्षे) या लहान मुलास क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा जीव धोक्यात घालून आडामध्ये उडी मारून सचिन शिवाजी पाटील या युवकाने वाचविले. रात्रीच्यावेळी आडात पडूनही वाचलेल्या आयुषला त्याच्यामुळे नवीन आयुष्य लाभले.‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या उक्तीची आठवण करून देणारा हा प्रसंग उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. रात्री ८ च्या सुमारास अंधारामुळे आयुष कैलास शेटे हा ५ वर्षाचा मुलगा पाण्यात पडला. तो दिसेनासा झाल्याने मुलाचे आजोबा व समाधान हेअर सलूनमध्ये आलेले सचिन पाटील हे मुलास शोधू लागले. मुलगा आडात पडला असावा, अशी शंका सचिन पाटीलला आली. त्याने मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने आडात पाहिले असता, पाणी हलत असल्याचे दिसले. मुलगा पाण्यात पडून तीन ते चार मिनिटे झाली होती. आडात पाच ते सहा फूट पाणी व मोटारी होत्या. दगडी बांधकामाचा अरुंद आड होता. पण जिवाची तमा न बाळगता सचिन पाटीलने आडात उडी मारून बालकास वर काढले. सचिनने प्रसंगावधान राखून बालकाच्या पोटावर दाब देऊन पोटातील पाणी काढले. नंतर दोरीच्या साहाय्याने सचिन पाटील व त्या बालकास सुखरूप बाहेर काढले. (वार्ताहर)अनेक दुर्घटनाहा आड रस्त्यापासून उंचीवर असल्याने नवख्या लोकांना याचा अंदाज येत नाही. यापूर्वीही या आडात एक व्यक्ती व गाय पडून जखमी झाली होती. गाईला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या आडास ग्रामपंचायतीने संरक्षक कठडा बांधून घ्यावा, अशी मागणी होत आहे.