शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचं जीणं ‘फेसाटी’त मांडलं: नवनाथ गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:18 IST

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील ...

बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांनी केले.येथील राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारतीच्या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे या दोघांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. गोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, जि. प. सदस्य सरदार पाटील, रा. स. प. अध्यक्ष अजित पाटील, मराठी-कन्नड साहित्य परिषदेचे डॉ. रवींद्र आरळी, डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित होते.मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की, शाळेमध्ये शिकवत असताना लहान मुलांसमोर आदर्श उभे करण्यासाठी मी लिहित गेलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी यशाचे शिखर गाठले, त्यांच्यावर लिहित गेलो आणि त्यातीलच एक कथा आठवीच्या बाल भारती या पुस्तकात समाविष्ट झाली. त्यामुळे लिखाणाची प्रेरणा वाढली.प्राचार्य डॉ. ढेकळे यांच्याहस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे व बालभारती या आठवी मराठीच्या पुस्तकात लेख समाविष्ट झाल्याबद्दल मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सत्कार केला.यावेळी डॉ. श्रीकांत कोकरे यांनी गोरे व ऐनापुरे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनाचा धगधगता प्रवास प्रेक्षकांसमोर उभा केला. मराठी विभागप्रमुख प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कुमार इंगळे यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. सागर सन्नके यांनी आभार मानले.जत तालुक्याच्या वैभवात भरडॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले की, जीवनामध्ये अनेक संकटे येतात. त्या संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य पुस्तकामध्ये असते. विचारांची एकरूपता आणि सामाजिक संवेदनशीलता एकत्र आले की नवीन साहित्य जन्माला येते. ‘फेसाटी’ कादंबरीस साहित्य अकादमीसारखा मोठा पुरस्कार प्राप्त झाला, ही जतच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे.