शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये पोषण आहार वाटपावर निर्बंध

By admin | Updated: July 6, 2015 00:53 IST

अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई : पुण्यातील प्रयोगशाळेत होणार कालबाह्य नमुन्यांची तपासणी

संख : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जत तालुक्यात दरीबडची येथील अंगणवाड्यांना भेट देऊन, कालबाह्य पोषण आहाराची माहिती घेतली होती. ठेकेदारांनी पोषण आहार उचलल्यामुळे कालबाह्य पोषण आहार आढळला नव्हता. पोषण आहारातील शिक्का पुसलेल्या दोन पिशव्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत पोषण आहाराचे वाटप थांबविले आहे. जत तालुक्यातील ३४५ अंगणवाड्यांना पसायदान महिला विकास संस्था सांगली या केंद्राकडून आहाराचा पुरवठा केला जातो. जत तालुक्यातील अंगणवाड्यांचे बालक, गरोदर महिला व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १ जुलैच्या अंकात प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत एकात्मिका बाल विकास योजना विभागाने कालबाह्य पोषण आहार परत घेण्याचे व नवीन पोषण आहार देण्याचे पत्र दिले. त्यानुसार तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांतील कालबाह्य पोषण आहार ठेकेदारांनी परत घेऊन नवीन पोषण आहाराच्या बॅगा दिल्या आहेत.अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल पवार, राहुल खंडागळे, श्रीमती रूपाली खापणे, तानाजी कांबळे यांच्या पथकाने दरीबडची येथील अंगणवाड्यांना भेट दिली होती. ठेकेदारांनी अगोदरच अंगणवाड्यांतील शिल्लक असलेला कालबाह्य पोषण आहार उचलला होता. त्यामुळे तेथे काहीही आढळून आले नाही. या पथकाने जतमध्येही भेट दिली. जतमधील संशयित ठिकाणाहून साठा हलविण्यात आल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)अंगणवाड्यांतील कालबाह्य पोषण आहार ठेकेदारास परत देऊन दुसरा देण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन पथकास दरीबडची येथे कालबाह्य पोषण आहार मिळाला नाही. परंतु बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोषण आहाराच्या दोन पिशव्या आम्ही दरीबडचीतून घेतल्या होत्या. त्यातील नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. अहवाल येईपर्यंत पोषण आहाराचे वाटप थांबविले आहे. - ए. आर. मडके, सहायक गटविकास अधिकारीचोर-पोलिसांचा खेळकालबाह्य पोषण आहाराच्या तक्रारी केल्यानंतर तो ठेकेदारांना परत करण्याचा शहाणपणा एकात्मिक बालविकास विभागास सुचला नाही. बातमी प्रसिध्द झाल्यानंतर लगेच ठेकेदारास तो परत करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाचा ससेमीरा चुकविण्यासाठी तर केला नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या खाबूगिरीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.