वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील लसीकरण केंद्रावर ६२२ जणांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा प्रारंभ वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, सरपंच सुरेश साठे यांच्या हस्ते करण्यात आला.
वाटेगाव ग्रामपंचायत व कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू केले असून, गावातील २८४६ लाभार्थी पैकी ६२२ जणांना कोरोना प्रतिबंध लस घेण्यात आली. नागरिकांनी लसीकरणास येताना आधार कार्ड घेऊन यावे, असे अवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भिसे यांनी केले.
यावेळी उपसरपंच शुभांगी पाटील, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रा. पं सदस्य विनोद जाधव, अनिल पाटील, शांतिनाथ शेटे, ए. के. होआळ, सुनंदा घोलप, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : वाटेगाव येथे लसीकरणावेळी शुभांगी पाटील, सुरेश साठे, डॉ राजेंद्र भिसे, उपस्थित होते.