शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

‘सखी मंच’ सोडतीत ३६ सखी भाग्यवान..पाककला प्रशिक्षणाला प्रतिसाद

By admin | Updated: October 22, 2014 00:25 IST

३७ हजारांची बक्षिसाची रक्कम : विद्या शिंदे ठरल्या दुहेरी विजेत्या

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने २0१४ या वर्षासाठी सदस्यत्व स्वीकारलेल्या सखी सदस्यांमधून भाग्यवान सोडत काढण्यात आली. ३७ हजार रुपये बक्षिसाची रक्कम असणाऱ्या या सोडतीमध्ये ३६ सखी सदस्या भाग्यवान ठरल्या.इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये पाककला प्रशिक्षणावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. प्रतिभा वाळवेकर, स्वाद कुकिंग क्लासेसच्या संचालिका सौ. सबा शेख, राखी शहा यांच्याहस्ते ही भाग्यवान सोडत काढण्यात आली. वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या बक्षिसांसाठी वृषाली लोहार (0५४७४0), विद्या शिंदे (0५४४0३), स्मिता जाधव (0५४९१६), वंदना पवार (0५४४५७), नीलिमा माळवदे (0५४१४१), उज्ज्वला जाधव (0५४९१४), सविता जाधव (१५२६६0), अनिता करळे (0५४२४८), वैशाली देसावळे (0५४४१६), लता कुलकर्णी (0५५२८८), कविता शेळके (0५९१३२), अपर्णा घाटगे (0५४२0७), कुसूम यादव (0५४८६0), सुविधा खराडे (0५४५४४), उज्ज्वला वाघमारे (0५४८४२), सुवर्णा सुतार (0५९२७७) या भाग्यवान सखी ठरल्या.मुक्तांगण प्ले स्कूल प्रायोजित बक्षिसाच्या विजेत्या अनिता यादव (0५४१९१), चांदणी शहा (0५९२३४), माधुरी पाटील (0५४३७३), स्वाती चव्हाण (0५९१४४), विद्या शिंदे (0५४४0३), भारती तांदळे (0५५२५४), माधुरी खैरे (0५४९४२), शकुंतला भोसले (0५४८४५), गौरी शहा (0५४२५४), मधुरादेवी पवार (0५९0३८) या ठरल्या.विद्यासागर आॅप्टिकल्सच्या बक्षिसांसाठी भाग्यश्री कंसारा (0५५४७३), वंदना कुलकर्णी (0५४१४0), राजश्री घळगे (0५४५९९), सुरेखा लवटे (0५५१२८), वंदना गावडे (0५९0४३), संगीता टेके (0५५२६३), सुरेखा कांबळे (0५४१७0), राजश्री संकपाळ (0५४१४६), मीनाक्षी कुंभार (0५४८९१), मीनाक्षी शिंदे (0५४७0५) या भाग्यवान सखी सदस्या ठरल्या आहेत.सखी मंचच्या पुढील कार्यक्रमात वरील बक्षिसांचे वितरण विजेत्या सखी सदस्यांना करण्यात येणार असल्याचे सखी मंच संयोजिकांनी सांगितले. (वार्ताहर)पाककला प्रशिक्षणाला इस्लामपुरात प्रतिसाद-- दिवाळीनिमित्त आयोजन : सखींना टिप्सइस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षणात शेफ आदिनाथ डोळ (सांगली) व शेफ सरदार जोसेफ (गोवा) यांनी अवघड वाटणाऱ्या पाककलेच्या सोप्या सोप्या टिप्स देत सखींना पाककलेच्या विषयात रममाण केले. जवळपास सहा तास चाललेल्या या प्रशिक्षणाचा लाभ सखींनी मोठ्या उत्साहाने घेतला.येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये ‘लोकमत’ सखी मंच व वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान गॅस व मायक्रोव्हेवमधील पदार्थ बनविण्यासह मिठाई, कॉन्टीनेंटल, इटालियन व इंडियन पदार्थ शिकण्याची मेजवानी सखींना मिळाली. शेफ आदिनाथ डोळ व जोसेफ सरदार यांनी गॅसवरील पदार्थ, तर दुपारी मायक्रोव्हेवमधील पदार्थांचे प्रशिक्षण दिले. क्रीम आॅफ टोमॅटो सूप, व्हेज गोल्ड कॉईन, हरा— भरा कबाब, व्हेज अ‍ॅग्रा— ३, पनीर रायता, मार्गरेट पिझ्झा, शाही तुकडा यासह अनेक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण सखींना देण्यात आले.या उपक्रमाचे प्रायोजक वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक प्रकाश वाळवेकर यांनी दिवाळीनिमित्त सखी सदस्यांसाठी खरेदीवर असणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. शेफ डोळ व सरदार यांनी सखींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतानाच स्वयंपाक घरातील टिप्सही दिल्या. वृषाली डोळ यांनी पिझ्झा बेस बनवताना कोमट पाण्यात ईस्ट व साखर घालावी, पदार्थ खारट झाला तर त्यामध्ये कणकेचा गोळा सोडावा, पालक उकळत्या पाण्यातून ब्लांच करताना सायट्रिक अ‍ॅसिड किंवा व्हिनेगर टाकावे, भेंडी टिकवायची असेल तर मधे काप देऊन डीप फ्राय करुन फ्रीजमध्ये ठेवावी, अशा टिप्स दिल्या. टोमॅटो शोरबा, अजीनोमोटो, रबडीविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी सौ. प्रतिभा वाळवेकर, गीता वाळवेकर, प्रीती वाळवेकर, संदीप वाळवेकर, किरण वाळवेकर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सखींना अल्पोपहार देण्यात आला. (वार्ताहर)