शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाटेगावात भूदान करणाऱ्यांच्या वारसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील हायस्कूलला साठ वर्षांपूर्वी शाळेची इमारत बांधण्यासाठी जागा दान देणाऱ्या दात्यांच्या वारसांचा सन्मान करून ...

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील हायस्कूलला साठ वर्षांपूर्वी शाळेची इमारत बांधण्यासाठी जागा दान देणाऱ्या दात्यांच्या वारसांचा सन्मान करून कासेगाव संस्थेच्या वाटेगाव हायस्कूलने सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांनी केले.

वाटेगाव (ता. वाळवा) येथील वाटेगाव हायस्कूलमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला जमीन दान दिलेल्या बाबासाहेब कृष्णाजी पाटील, आनंदराव माधवराव पाटील, प्रदीप संभाजीराव देशमुख या वारसांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, रवींद्र बर्डे, सरपंच सुरेश साठे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

बर्डे म्हणाले, कमी जमीन असतानाही जमीन दान केलेल्या त्यागातून व सर्वांच्या सहकार्याने शाळेची इमारत उभी राहिली. गावात अनेक अधिकारी निर्माण झाले. जनार्दन पाटील म्हणाले, गावाने व मुख्याध्यापक जे. एस. पाटील यांनी शिक्षकांचे सहकार्य घेऊन शाळा बोलकी केली. सध्या वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्कचा वापर करा, असे आवाहन केले. विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जनार्दनकाका पाटील, रवींद्र बर्डे, संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधिक केक कापून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, मुख्याध्यापक जे. एस. पाटील, आनंदराव पाटील, एम. टी. कुरणे, जे. आर. पाटील, श्रीमती एस. एन. पाटील, जे. ए. शेळके, आर. पी. पवार, संजय चव्हाण राजेंद्र पाटील उपस्थित होते.

फोटो : १६०२२०२१-आयएसएलएम- वाटेगाव न्यूज

वाटेगाव हायस्कूलमध्ये जमीन दात्यांचा जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे, शामराव पाटील, जे. एस. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.