शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

कडेगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचे ठराव

By admin | Updated: October 3, 2016 00:23 IST

शांततेच्या वातावरणात ग्रामसभा : काही ठिकाणी सभा तहकूब; विविध ठराव एकमताने मंजूर

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी, मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करावे आणि या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांबाबतचे ठराव सर्वानुमते मंजूर केले. दरम्यान, कडेपूर, शिरसगावसह काही ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्या. कोरमअभावी तहकूब झालेल्या गावांमध्ये लवकरच पुन्हा ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबतचे ठराव घेणारच आहे, असे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सांगितले. दि. २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गावोगावी ग्रामसभा शांततेच्या वातावरणात झाल्या. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर, घटनात्मक बदल करून आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील नराधमांना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, शेतीमालाला भाव देण्यासाठी स्वामीनाथन् समितीचा अहवाल स्वीकारावा आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागण्यांचा ठराव अनेक ग्रामसभांमध्ये करण्यात आला. चिंचणी (अंबक) येथील काही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेस अनुपस्थित होते. या सदस्यांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. देवराष्ट्रे येथे ग्रामसचिवालय इमारतीमधील दुकानगाळे भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा विषय ऐरणीवर आला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा नियमानुसार निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर चिंचणी, देवराष्ट्रे, वांगी, आसद, तडसर, नेवरी, अंबक, विहापूर, सोनकिरे, शाळगावसह अनेक ग्रामपंचायतींनी मराठा आरक्षणाचे ठराव केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर) ग्रामसभांबाबत अधिकारी अनभिज्ञ कडेगाव तालुक्यातील किती ग्रामसभा झाल्या आणि किती ग्रामसभा तहकूब झाल्या, याबाबत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास विचारणा केली असता, याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही, असे ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांना किती गावात ग्रामसभा झाल्या, कशा झाल्या, ठराव कोणते झाले याची माहिती नव्हती. दरम्यान, चिंचणी येथील तरूणांनी मराठा आरक्षण ठराव घेण्याबाबतचा निश्चय केला होता. परंतु कोरम पूर्ण होत नव्हता. यावेळी तरूणांनी घरोघरी फिरून ग्रामस्थांना ग्रामसभेत आणले. मग कोरम पूर्ण झाला आणि मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर झाला.