शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी सवलतीस सदस्यांचा विरोध

By admin | Updated: March 9, 2016 00:55 IST

आज महासभा : प्रस्ताव बारगळण्याची शक्यता

सांगली : महापालिका क्षेत्रातील घरपट्टी थकबाकीदारांना शास्तीत ५० टक्के सवलत देण्यास सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी पक्षीय बैठकीत विरोध केला. थकबाकीदारांना सवलत देण्यापेक्षा नियमित कर भरणाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिकेची महासभा बुधवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात घरपट्टीची थकबाकी ३५ कोटींच्या घरात आहे. घरपट्टी न भरणाऱ्यांना महिन्याला दंड लागू केला जातो. या शास्तीची रक्कम पाच कोटींवर गेली आहे. थकबाकीदार शास्तीमुळे घरपट्टी भरत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला आहे. यामुळे थकबाकीदारांना शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली, तर वसुली चांगली होईल, म्हणून सवलतीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत आणला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कर बुडव्यांना अडीच कोटींची सवलत देऊ नये, अशी मागणी अनेकांनी केली. थकबाकीदारांना सवलत दिली, तर नियमित कर भरणाऱ्यांत वेगळाच संदेश जाईल. त्यात सवलत देण्याचा अधिकार आयुक्तांचा आहे. त्यांनी स्वत: निर्णय घ्यावा. महासभेकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज नाही. भविष्यात विशेष लेखापरीक्षणात आक्षेप आल्यास नगरसेवकांची वसुली लागू शकते, असेही नगरसेवक प्रदीप पाटील, दिलीप पाटील, निर्मला जगदाळे, मृणाल पाटील आदींनी निदर्शनास आणून दिले. करबुडव्यांऐवजी कर भरणाऱ्यांना सवलत दिल्यास थकबाकीचे प्रमाण कमी होईल, असे मतही काही नगरसेवकांनी मांडले. त्यावर महापौर शिकलगार यांनी, या विषयावर खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे. सभागृहात सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सत्ताधारी गटातूनच सवलत देण्यास विरोधाचा सूर उमटू लागल्याने, सवलतीचा हा विषय बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)प्रशांत मजलेकर : संचालकपदी शक्यसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून महापालिकेचा प्रतिनिधी पाठविण्याबाबतही पक्षबैठकीत चर्चा झाली. या पदासाठी माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर व माजी स्थायी समिती सभापती संजय मेंढे हे दोघे इच्छुक आहेत. यापैकी मजलेकर हे नगरसेवक व व्यापारी आहेत. त्यांचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांची बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती होऊ शकते. याचा फैसला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व माजी मंत्री आमदार पतंगराव कदम करणार आहेत. बुधवारी होणाऱ्या महासभेत मैला वाहतुकीच्या दरात वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पूर्वी किलोमीटरला २० रुपये दर होता. आता तो ५० रुपये केला जाणार आहे. जागा भाडेपट्टी, रस्ते खुदाईच्या दरवाढीबाबत सभेत चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिकलगार यांनी सांगितले.