शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंड ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

सांगली : महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून जागामालकांना सात दिवसांत नोटिसा बजाविण्याचे ...

सांगली : महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून जागामालकांना सात दिवसांत नोटिसा बजाविण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगररचना विभागाला दिले. या निर्णयामुळे आरक्षित भूखंडाच्या बाजार रोखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेची सभेत काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील म्हणाले, विकास योजनेत अनेक आरक्षणे ठेवली जातात. मात्र, या आरक्षित जागा महापालिका वेळेवर ताब्यात घेत नाही नंतर या जागामालकांकडून या भूखंडाची विक्री होते. अनेक आरक्षित भूखंडावर गुंठेवारी वसली आहे. शहरातील रहिवासी भागांवरही आरक्षणे आहे. त्यामुळे ही आरक्षणे उठवणे हेही महत्त्वाचे आहे. शहरात नेमकी आरक्षणे कुठे व कोणती आहेत? या आरक्षित भूखंडावर गुंठेवारी, रहिवासी आहेत? का ? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी विकास योजनेतील सर्वच आरक्षणे ताब्यात घेण्यासंबंधित महापालिकेने कायदेशीर कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली.

भाजपचे शेखर इनामदार यानीही संतोष पाटील यांच्या या मागणीला पाठिंबा दिला. महापौर गीता सुतार यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची सूचना केली. आयुक्त कापडणीस यांनी येत्या सात दिवसांत नगररचना विभागाने आरक्षित सर्व भूखंडांच्या मालकांना नोटिसा बजावाव्यात व आरक्षित जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिले.

चौकट

चौक, पुलाचे नामकरण

माधवनगर रस्त्यावरील चौकाला मदनभाऊ स्मारक चौक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. हाच धागा पकडत नगरसेविका रोहिणी पाटील यांनी विश्रामबाग उड्डाणपुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची उपसूचना दिली. संतोष पाटील, विष्णू माने यांनी त्याचे समर्थन केले पण भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी हरकत घेतली. पण महापौरांनी या सूचनेवर हरकती मागण्यास मंजुरी दिली.