शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खानापुरात निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, ...

विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयानुसार मंगळवार, दि. १५ रोजी काढण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. परंतु, कोरोनामुळे आयोगाने निवडणुकांना स्थगिती दिली आहे. आता दि. ११ डिसेंबरला आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आचारसंहिताही सुरू झाली आहे. तर दि. १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील देविखिंडी, मंगरूळ, तांदळगाव, मेंगाणवाडी, रेणावी, खंबाळे (भा.), शेंडगेवाडी, भडकेवाडी, पारे, माहुली, नागेवाडी, पोसेवाडी व भिकवडी बुद्रुक या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आ. अनिल बाबर समर्थकांची सत्ता आहे. मात्र, यावेळी राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचा प्रयोग कितपत यशस्वी होणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट :

लक्षवेधी लढती

दि. १५ जानेवारीला होणाऱ्या खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी मंगरूळ, माहुली, नागेवाडी, रेणावी व खंबाळे (भा.) या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.