शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’स पुन्हा जप्तीची नोटीस

By admin | Updated: August 28, 2014 23:04 IST

तहसीलदारांची कारवाई : बिलाचे ४६ कोटी थकित

मिरज : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास शेतकऱ्यांच्या उसाच्या बिल वसुलीसाठी महसूल विभागाने मालमत्ता जप्तीची दुसरी नोटीस बजावली आहे. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना ही नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.  -वसंतदादा साखर कारखान्याने २०१३ व १४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रूपये शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाहीत. यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्याने साखर आयुक्तांनी, ही रक्कम कारखान्याची मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश दिले आहेत. १२ जुलैरोजी महसूल विभागाने कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडून कारखान्यासमोरील कर्मचारी वसाहतीसह शेजारील २१ एकर भूखंड विक्री करून शेतकऱ्यांची देणी भागविण्याच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेऊन या जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी तहसीलदार किशोर घाटगे यांनी कारखान्याच्या सर्वच मालमत्तेवर शासनाचा बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली आहे. महसूल विभागाने काढलेल्या नोटिसीमध्ये असे म्हटले आहे. सात दिवसात शेतकऱ्यांच्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रूपये महसूल विभागाकडे जमा केले नाहीत, तर कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढवून त्याची विक्री करून रक्कम वसूल करण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे. दुसऱ्या नोटिसीला कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यास तिसरी नोटीस देण्यात येऊन वसुली व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. (वार्ताहर)