शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल गुलदस्त्यात?

By admin | Updated: December 15, 2015 00:41 IST

जिल्हा परिषद : ऐच्छिक हिंदी संस्थेमधून घेतली पदवी

रत्नागिरी : केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा या ऐच्छिक हिंदी संस्थेमधून घेतलेल्या बी. एड. पदवीच्या आधारे विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दापोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची चौकशी होऊन महिना उलटला तरी अद्याप चौकशीनंतर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत बोगस पदव्यांचा विषय गाजला. मात्र त्यानंतर तो थंडही झाला असल्याचे यामुळे दिसून येत आहे. अलाहाबाद विद्यापीठातून घेतलेल्या पदवीच्या आधारे पदोन्नती घेतलेल्या २६ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दणका दिला होता. त्या पदवीधर शिक्षकांना उपशिक्षक म्हणून मूळ पदावर आणले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डिमोशन करण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई होती. हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेची विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांनी घेतलेल्या राष्ट्रभाषा पंडित पदवीनंतर केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रातून बी. एड. पदवी सन १९९९ सालात धारण केलेली आहे. या दोन्ही पदव्या पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यताप्राप्त नाही, असा १४ जून १९९९चा शासन निर्णय आहे. पुन्हा त्यांनी सन २००४ सालात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. ए. पदवी घेतलेली आहे. शासन निर्णय असतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे शिंदे यांची विस्तार अधिकारीपदी नियुक्ती केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिंदे यांची विस्तार अधिकारीपदी झालेली नियुक्ती वादात अडकणार, हे निश्चित होते. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. चौकशी अधिकारी लोहार यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे महिनाभरापूर्वीच सादर केलेला आहे. या चौकशीच्या अहवालानुसार शिंदे अडचणीत येणार हे निश्चित आहे. याप्रकरणी अहवालानुसार पुढील कारवाई होणे आवश्यक होते. मात्र, महिना उलटला तरी अद्याप या प्रकरणी काहीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा अहवाल इतके दिवस बासनात का आहे, याबाबत शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. (शहर वार्ताहर)महिन्यानंतर : अहवाल बासनातच...विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे चौकशीप्रकरण.शिंदे अडचणीत येणार.चौकशी अहवाल धूळखात पडून.पदवी सरळ भरतीसाठी मान्यताप्राप्त नाही.