शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

राजारामबापू नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने इस्लामपूर पालिकेच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या राजारामबापू नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने इस्लामपूर पालिकेच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या राजारामबापू नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी पालिका सभागृहात ठरावही झाले आहेत; परंतु हे काम संथगतीने सुरू आहे. सध्या बाल्कनी परिसरात अडगळीत असलेले सामान अस्ताव्यस्त टाकले आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.

इस्लामपुरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेचे राजारामबापू पाटील यांच्या नावाने एकमेव नाट्यगृह आहे. या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अलीकडील काळात शालेय वार्षिक स्नेहसंमेलनही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. परंतु, या नाट्यगृहाकडे पालिका प्रशासनाचे पूूर्णपणे दुर्लक्ष आहे. नाट्यगृह सुरू झाल्यापासूनच साऊंडचा आवाज दबला आहे. तेथील स्वच्छतागृहाची अवस्था असून नसल्यासारखी आहे. स्पॉटलाईट गायब झाले आहेत. त्यामुळे या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी पालिकेने आर्थिक तरतुदी केल्या आहेत. परंतु, कोरोना महामारीमुळे हे नाट्यगृह गेल्या वर्षभरात बंद अवस्थेत होते. या कालावधीतच नाट्यगृहाचे नूतनीकरण होऊ शकले असते. परंतु, त्याला मुहूर्त लागलेला नाही.

याचाच फायदा येथील एका संस्थेने घेऊन बाल्कनी परिसरात अडगळीतले सामान रचले आहे. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. कोरोना निवळत आल्याने पुन्हा आता काही संस्था करमणुकीच्या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. परंतु, नाट्यभाड्ये व्यतिरिक्त साऊंड, लाईटस् यासाठी वेगळा खर्च करावा लागत असल्याने या नाट्यगृहाकडे कलाकारासह नाट्यरसिकांनी पाठ फिरविली आहे.

कोट

या नाट्यगृहाचा रंगमंच अपुरा असल्याने मोठे कार्यक्रम होऊ शकत नाहीत. स्पॉट लाईटचीही कमतरता आहे. चांगल्या प्रतीचा साऊंड सिस्टीम नाही. बसण्याच्या खुर्च्या आरामदायी नाहीत. स्वच्छतागृहाचा आणि पाण्याचा अभाव आहे. याची कल्पनाही आमचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिली आहे.

-रोझा किणीकर, माजी अध्यक्षा, नाट्यपरिषद, इस्लामपुर

फोटो - २४०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज

राजारामबापू पाटील नाट्यगृह नूतनीकरणापासून वंचित आहे. त्यातच बाल्कनीत टाकलेले अडगळीचे सामान.