शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे गाळे काढून घेणार

By admin | Updated: April 26, 2017 23:49 IST

आज नोटिसा : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई

सांगली : विष्णुअण्णा फळ मार्केटमधील कांदा-बटाटा व्यापारी आणि बाजार समिती कर्मचारी यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने तीस व्यापाऱ्यांना फळ मार्केटमधील गाळे काढून घेण्याच्या नोटिसा गुरुवारी दिल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित करीत मालाची विक्री केली. येथील फळ मार्केटमध्ये सोमवारी सकाळी कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा आलेला माल उतरविण्यासाठी मालवाहतूक ट्रक रस्त्यावर लावण्यात आला होता. चार दिवसांपासून फळ मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असल्याने त्या वाहनांची भर पडली आहे. कांदा व्यापाऱ्यांचा ट्रक बाजूला करण्यात यावा, अशी विनंती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केली. मात्र ट्रक बंद पडला असल्याने तो काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यातून वाद टोकाला गेला. बाजार समितीकडून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांना प्रत्येक गाळ्यासाठी एक रुपया भाडे आकारले जाते. चार महिन्यांपूर्वी महिन्याला अडीच हजार रुपये भाडे करण्यात येणार असल्याची नोटीस पाठविली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कांदा, बटाटा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून बाजाराचे स्थलांतर केले आहे. वॉलमार्टच्या आवारामध्ये सलग दुसऱ्यादिवशी व्यापार नेण्यात आला. व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे कांदा-बटाटा व्यापाऱ्यांकडे असलेले तीस गाळे काढून घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्याबाबतची नोटीस गुरुवारी व्यापाऱ्यांना दिली जाणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, फळ मार्केटचे सभापती अजित बनसोडे आणि बाजार समिती सचिव पी. एस. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वाद पेटलाविष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये बाजार समितीकडून मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, म्हणून कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून, सांगली-कोल्हापूर रस्त्यावर वॉलमार्टच्या आवारात व्यापार स्थलांतरित केला आहे. दुसऱ्या दिवशीही येथे कांदा आणि बटाट्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांनी बाजाराचे स्थलांतर केल्यामुळे बाजार समिती प्रशासनानेही कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये तोडग्याऐवजी संघर्ष टोकाला जात आहे.