शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

By admin | Updated: June 8, 2017 23:16 IST

पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा महामार्ग रोखू

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : चाफळ ते उंब्रज दरम्यानच्या ११ बंधाऱ्यांच्या फळ्या पाटबंधारे विभागाने काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाहून गेला आणि नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले.यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उत्तरमांड नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळू लागली असून, पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका या सर्व शेतकऱ्यांना बसला असून, चाफळ येथील उत्तरमांड नदीवरील धरणातून तातडीने पाणी नदीपात्रात सोडावे, अन्यथा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला.उत्तरमांड नदीवर चाफळ येथे धरण झाले, चाफळ ते उंब्रज दरम्यान जुने आणि नवीन अशा ११ बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा केला जातो. यामुळे या नदीच्या काठावरील पाटण व कऱ्हाड तालुक्यातील गावांची सुमारे ६०० हेक्टर जमीन भिजते. या जमिनीना पाणीपुरवठा होतो म्हणून याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी ही पाटबंधारे विभागाकडून घेतली जात असते. सद्य:स्थितीला अजूनही पाऊस पडला नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गडबड करून २२ मे नंतर फळ्या काढल्या आणि बंधाऱ्यात असलेले पाणीही वाहून गेले. यामुळे उत्तरमांड नदीपात्र कोरडे पडले असून, ठणठणाट झाला आहे.पिकांना आणि जनावरांना ही पाणी कसे पाजायचे, असा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.पाऊस पडला नाहीतर या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी कोठून पाजायचे याचे कसलेही नियोजन पाटबंधारे विभागाने केले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके जातील आणि याला करणीभूत पाटबंधारे विभागच राहील. चाफळ येथील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील फळ्या काढून पाणी सोडून दिले ती चूक सुधारण्यासाठी त्यांनी आता चाफळ धरणातून उत्तरमांड नदीत पाणी सोडावे आणि ऐनभरात आलेल्या आमच्या पिकांना जीवदान द्यावे.याबाबत दखल घेऊन पाणी धरणातून सोडले नाही तर मात्र आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उंब्रज येथून जाणारा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहोत, असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.बंधाऱ्यावरील फळ्या ३१ मे पूर्वी काढाव्यात, असा शासनाचा नियम आहे. या नियमानुसार आम्ही बंधाऱ्यावरील फळ्या काढल्या आहेत; पण पाऊस पडला नाही, यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे आम्ही बुधवारी लघू पाटबंधारे विभाग सातारा यांच्याकडे पाणी सोडावे, अशी लेखीपत्राने मागणी केली आहे. पाणी धरणातून सोडण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्या विभागाकडून ही तातडीने पाणी सोडले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.- शामराव नांगरे, शाखा अभियंता, तारळी व उत्तर मांड उपसासिंचन विभाग तारळे