शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालये धार्मिक गुलामीतून मुक्त करा

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

देव-देवतांच्या प्रतिमा प्रार्थनास्थळांमध्ये स्थलांतरित कराव्यात,

सांगली : शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तेथील देव-देवतांच्या प्रतिमा प्रार्थनास्थळांमध्ये स्थलांतरित कराव्यात, अशी प्रमुख मागणी सेक्युलर मुव्हमेंट संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या प्रक्रियेसाठी सप्टेंबरअखेर मुदत देण्यात आली असून, एक आॅक्टोबरपासून कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांनी यावेळी दिला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे सेक्युलर मुव्हमेंटच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भारतात सध्या जी बहुमतीय निवडणूक पध्दती प्रचलित आहे, ती लोकशाहीमधील ‘एक मत एक मूल्य’ या तत्त्वाशी विसंगत असल्याचे नमूद करुन निवेदनात म्हटले आहे की, सध्या १५ टक्के मते मिळविणारा उमेदवार निवडून येतो, तर ८५ टक्के मते वाया जातात. यामुळे प्रमाणबध्द निवडणूक पध्दतीचा अवलंब करुन पक्षीय निवडणूक पध्दती अवलंबावी. सर्व प्रार्थनास्थळे पुजारी आणि भिकारीमुक्त करावीत, वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांकडे जमा झालेली संपत्ती, देखभालीचा खर्च वजा जाता शासनाकडे वर्ग करावी, विपश्यनेला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे अंधश्रध्दा वाढण्याची शक्यता असल्यामुळे शाळा आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी शासनाने आवश्यक केलेले विपश्यनेचे वर्ग रद्द करावेत, महाराष्ट्राबाहेरील अनु. जाती, अनु. जमातीच्या लोकांना महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात समाविष्ट करणारा प्रचलित कायदा रद्द करावा, जाती निर्मूलनाचा कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. याप्रसंगी जयंत भालेराव, भारती ढवळे, राजू कदम, आकाश साबळे, डॉ. अशोक गायकवाड, गौतम सांगले, प्रा. साहेबराव नितनवरे, विष्णू काकडे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद सारनाथ, प्रा. सुभाष दगडे, प्रा. सचिन गरुड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)