शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात पुन्हा साखळी भेटवस्तू योजना सुरू...

By admin | Updated: January 19, 2015 00:29 IST

फसवणुकीची शक्यता : कंपनीच्या नावात मात्र बदल

दिलीप मोहिते - विटा -सांगली जिल्ह्याची सुवर्णनगरी म्हणून असलेल्या विटा शहरात पुन्हा एकदा साखळी भेटवस्तू योजनेने डोके वर काढले असून, आठवड्याला ठराविक रक्कम भरून घेऊन ग्राहकांच्या माथी कमी दर्जाच्या व गॅरंटी नसलेल्या वस्तू मारून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी ज्यांनी अशा काही योजनांतून शहरासह खानापूर तालुक्यात धुमाकूळ घातला, तेच यात सक्रिय आहेत.तालुक्यात दहा वर्षांपूर्वी सुमन गारमेंट नावाच्या कंपनीने अवघ्या ६० रुपयांत दोन परकर देऊन ड्रॉ काढल्यानंतर विजेत्या ग्राहकांना चार ते पाचअंकी बक्षिसाचे आमिष दाखविले. फक्त एक ते दीड वर्षात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ, जत, मिरज यासह सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात सुमन गारमेंटने चांगलाच हंगामा केला. या मार्केटिंगसाठी संचालकांनी ग्रामीण भागातील एजंटांची नेमणूक करून त्यांनाही दुचाकी, चारचाकी गाड्यांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधींची माया जमा केली.त्यानंतर मात्र या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. त्यातील संचालक स्थानिक खानापूर तालुक्यातीलच रहिवासी होते. परंतु, लोकांची रक्कम परत मिळाली नसल्याने कोट्यवधींचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी विटा शहरात अशाच एका भेटवस्तू साखळी योजनेचा जन्म झाला असून, सर्वसामान्यांना पूर्वी आर्थिक गंडा घातलेल्या काही संचालकांचा या कंपनीत समावेश करण्यात आला असल्याचे बोलले जाते.या कंपनीत आठवड्याला पाचशे ते हजार रुपयांची गुंतवणूक करून आठ दिवसाला ड्रॉ काढण्यात येतो. त्यात विजेत्याला आकर्षक भेटवस्तूचे आमिष दाखविण्यात येते. परंतु, ही भेटवस्तू ग्राहकाने भरलेल्या रकमेपेक्षा कमी दराची व विनागॅरंटी असल्याने फसवणूक होत आहे. तरीही कंपनीचे संचालक व एजंट हे ग्रामीण भागातील लोकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काय आहे योजना...नव्याने सुरू झालेल्या अशाच एका साखळी भेटवस्तू योजनेत कंपनी ग्राहकांकडून आठवड्याला पाचशे ते सातशे रुपये भरून घेऊन ड्रॉ काढत आहे. सहभागी ग्राहकांपैकी अवघ्या एक ते दोन ग्राहकांना भेटवस्तू देऊन उर्वरित ग्राहकांना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करण्यास भाग पाडत आहे. परंतु, पुढील आठवड्यापर्यंत ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ होऊन मागील ग्राहकांना पुन्हा पाचशे ते सातशे रुपये भरणे भाग पडत आहे. त्यामुळे योजनेद्वारे मिळणारी भेटवस्तू ही विनागॅरंटी व दर्जाहीन असल्याची चर्चा आहे.विटा शहरात विनापरवाना साखळी भेटवस्तू योजना सुरू करून लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी व त्या कंपनीच्या संचालकांची गय केली जाणार नाही. एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास किंवा फसवणुकीची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यास तातडीने संचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- अनिल पोवार, पोलीस निरीक्षक, विटा