शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

छातीवरचा बिल्ला हाच माझ्यासाठी लाल दिवा..!

By admin | Updated: November 4, 2015 23:06 IST

सदाभाऊ खोत : एफआरपी एकरकमीच घेणार--सरकारला खरंच शेतीतले कळत नाही

सागाव : मला शासनाच्या लाल दिव्याची गरज नाही. माझ्या छातीवरचा बिल्ला हाच माझा लाल दिवा आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाचा एफआरपी एकरकमीच घेणार, याबाबत राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहमत आहेत. जर याला कारखानदार अथवा सरकारने विरोध केला तर, रस्त्यावर उतरुन संघर्ष उभारू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.सागाव (ता. शिराळा) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर अध्यक्षस्थानी होते.खोत म्हणाले, ६ नोव्हेंबरच्या जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये सहकाराला साखर कारखाने खासगी करता येणार नाहीत. यासाठी कायद्यामध्ये कठोर निर्बंध घालावेत, अशा मागणीचे ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला भाग पाडणार आहे. मला जर कोणत्याही पदाची अपेक्षा असती तर, आतापर्यंत मी दहा पक्ष बदलले असते. यावेळी रविकांत तुपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष राम पाटील, भास्करराव कदम उपस्थित होते. (वार्ताहर)सरकारला खरंच शेतीतले कळत नाहीया राज्यातील सरकारला शेतातील काही समजत नाही, अशी टीका होते, हे खरंच आहे. मी या मताशी सहमत असून, पवार साहेबांना शेतीतील जास्त समजत असल्याने त्यांनी शेतीची पूर्ण वाट लावली आहे. या अगोदर आंदोलनावेळी पोलीस आमच्या अंगावर येत होते. परंतु आता याउलट स्थिती आहे. यावर्षीचा एफआरपी हा एकरकमीच घेणार आहे. जर कारखानदारांनी विरोध केला तर रस्त्यावर उतरुन संघर्ष करू, असे खोत यांनी स्पष्ट केले.