शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पाण्याचा पुनर्वापर : बचतीबरोबर हवा जलसंधारणावर भर !

By admin | Updated: July 26, 2014 00:31 IST

लोकमत इनिशिएटिव्ह

सांगली : जिल्ह्याला वरदान ठरलेल्या चांदोली (वारणा) धरणाने जून महिन्यात प्रथमच तळ गाठला होता. शेतीच्या पाणी वापरावर बंदी घालण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि ते साठवले नाही, तर भविष्यात यावर्षीपेक्षाही भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय सोडण्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही गावांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यातूनच प्रेरणा घेण्याची गरज आहे. काही गावे दुष्काळातही ‘पाणीदार’ होती. या गावांनी केलेल्या जलसंधारणातील कामांचा आदर्श आपणही घेण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात चांदोली (वारणा) हे एकमेव धरण आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असले तरी, कृष्णा नदीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या ५० टक्के भागाला त्याचा फायदा होतो. मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे चांदोली आणि कोयना या दोन्ही धरणांनी तळ गाठला होता. कोयना धरण प्रथमच कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता होती. पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण झाले की, प्रशासन, राज्यकर्ते आणि आपणही निसर्गाच्या लहरीपणाकडे बोट दाखवून हात वर करण्यात धन्यता मानतो. मात्र, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी माझ्या गावाने काही तरी केले पाहिजे, याची प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गार्डी, सांगोले, रेणावी, बेणापूर, कडेगाव तालुक्यातील शाळगाव, वांगी या गावांनी जलसंधारणाचे आदर्श प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे दुष्काळातही या गावांना पाणीटंचाई जाणवली नाही. या ‘पाणीदार’ गावांनी पाणीटंचाईवर कशी मात केली, याची माहिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. पाणी बचतीबाबत अनेकवेळा चर्चा होते, विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरु झाला की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे.सामूहिक जबाबदारी-सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा-येत्या पावसाळ्यात मोठमोठ्या चरी घेऊन पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्या-जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे-नैसर्गिक जलस्रोत व टेकांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून आपली ओळख जपावैयक्तिक जबाबदारी-ग्रामस्थांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा-अंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे-नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी-शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देताना अतिरिक्त पाणी देऊ नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावेअंघोळ -बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर ४शॉवरखाली : १०० लिटरदाढी-नळ सोडून दाढी केल्यास : १० लिटर-मग घेऊन : १ लिटरब्रश-नळ सोडून केल्यास : १० लिटर-मग घेऊन : १ लिटरकपडे-नळाखाली : ११६ लिटर-बादलीचा वापर : ३६ लिटरमोटार४पाईप वापरल्यास : १०० लिटर-बादलीचा वापर : १८ लिटरहात धुण्यासाठी-नळाखाली : १० लिटर-मग घेऊन : अर्धा लिटरशौचविधी-फ्लश केल्यास : २० लिटर-बादलीचा वापर : ६ लिटरग्रामस्थांनो, लक्षात ठेवाखरं तर आपण पाण्याची काटकसर करत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या अमर्याद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.