शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीची थकबाकी २७ कोटींवर वसुलीसाठी पथक

By admin | Updated: May 24, 2014 00:42 IST

करसंकलनाबाबत आयुक्तांकडून गंभीर दखल

 सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या थकबाकीचा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच आहे. यंदा ही थकबाकी २७ कोटींवर गेली आहे. याची गंभीर दखल घेत आज आयुक्त अजिज कारचे यांनी १६ कर्मचार्‍यांचे विशेष पथक नियुक्त केले असून, कोणत्याही परिस्थितीत थकबाकीचा डोंगर कमी झालाच पाहिजे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये ९ वरिष्ठ कर्मचारी असून, त्यांना वॉरंट आॅफिसरची जबाबदारी देण्यात आली आहे. ९ कनिष्ठ कर्मचारी लिपिक म्हणून कार्यरत राहणार असून, ३ शिपाईसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. घरपट्टीची थकबाकी व चालू वसुली याबाबत या पथकाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या पथकाच्या कामावर आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. घरपट्टी थकबाकीचा चालू उद्दिष्टासह एकूण आकडा २७ कोटींवर गेला आहे. आर्थिक अडचणींमुळे हैराण असलेली महापालिका आता घरपट्टी थकबाकीमुळे हैराण झाली आहे. घरपट्टी थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या स्थापनेपासून कायम आहे. जुनी थकबाकी आणि चालू उद्दिष्ट यांच्या वसुलीसाठी नेहमीच या विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरे साहित्य या गोष्टीही वसुलीवर परिणाम करणार्‍या होत्या. नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या संस्था, कार्यालयांचीही घरपट्टी थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. घरपट्टी वसुली करताना काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने अशा न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्येही महापालिकेला काही करता येत नाही. नागरिकांकडून घरपट्टीची वसुली करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. सर्वसामान्य मालमत्ताधारक प्रामाणिकपणे कर भरत असताना मोठमोठ्या संस्था व राजकीय लोकांच्या हितसंबंधात अडकलेल्या मालमत्तांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय हस्तक्षेप थांबला तरच वसुलीचा डोंगर कमी होऊ शकतो. त्यासाठी आयुक्तांनी कडक भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. जकात विभागातही असाच राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कित्येक वर्षे या विभागाला मोठी गळती होती. जकातीचा खासगी ठेका दिल्यानंतर जकातीच्या उत्पन्नाचे खरे आकडे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर महापालिकेने ठेकेदारी बंद करून स्वबळावर वसुली सुरू केली. शंभर कोटींपर्यंतची मजल या विभागाने मारली. या गोष्टी साध्य करताना राजकीय हस्तक्षेप बंद केल्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळेच घरपट्टीबाबतही अशीच भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. आयुक्तांनी घरपट्टी वसुलीबाबत गांभीर्याने पावले उचलल्यामुळे या विभागालाही आता दिलासा मिळाला आहे. नव्या पथकामुळे वसुली वाढण्यास मदत होणार आहे. थकबाकीसह चालू उद्दिष्टावरही लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)