शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पूर नुकसानीची कर्नाटककडून वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:46 IST

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी ...

सांगली : सांगली जिल्ह्यातील महापुराला कोयना धरणाच्या असमन्वयासह अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरही तितकेच कारणीभूत आहे. शहरातील नुकसानीच्या भरपाईसाठी महापालिकेने अलमट्टी धरणाच्या प्रशासनाविरोधात याचिका दाखल करावी, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय, संघटनांच्या बैठकीत करण्यात आली.महापौर संगीता खोत यांच्या पुढाकाराने महापुराच्या उपाययोजना व पूरनियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेत सर्वपक्षीय संघटनांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त राजेंद्र तेली, स्थायी सभापती अजिंक्य पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, हारुण शिकलगार, नगरसेविका स्वाती शिंदे, योगेंद्र थोरात, जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अनारकली कुरणे, विजय घाडगे, अमर पडळकर आदी उपस्थित होते.माजी अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर धरण, तेरवाड धरण, म्हैसाळ योजनेचे बॅकवॉटर यामुळे सांगलीत महापूर येतो. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील. धरणात पाणीसाठा किती असावा, याचाही निकष आहे. प्रत्येकवर्षी अलमट्टी असो वा कोयना धरण, पाटबंधारे विभागाच्या नियमावलीनुसार महापूर न येण्यासाठी एक आॅगस्टपर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असता कामा नये. एक सप्टेंबरपर्यंत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असू नये. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.सतीश साखळकर म्हणाले, पूरनियंत्रण व त्यावर उपाययोजना, मदतीसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतही डिझास्टर असोसिएशन स्थापन करावी. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ आदींची समिती करावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महिला, मुलींना प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.शिवाजीराव ओऊळकर यांनी, महापुरावर सरदार पाटील यांनी पीएच.डी. केली आहे, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना केली. शिकलगार म्हणाले, महापुराचे किंवा पावसाचे पाणी शामरावनगरात शिरल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधीतून अडीच कोटी रुपयांची गटार बांधण्यात आली. पण ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने फटका बसत आहे.शैलेश पवार म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्ता पाण्याखाली जातो. तो जाऊ नये यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारी करून सर्व पाणी अंकलीमार्गे नदीकडे सोडण्यासाठी बांधीव गटारींचा प्रस्ताव होता. तो अमलात आणावा. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, कोयना धरणातून विसर्गामुळे महापूर येतो. त्याऐवजी थेट कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे दुष्काळी भागाला द्यावे. यावेळी जगन्नाथ ठोकळे, मयूर घोडके, अश्रफ वांकर, आसिफ बावा यांनीही सूचना मांडल्या.अखेर संगीता खोत यांनी, महापूर नियंत्रणाबाबत उपाययोजना, अलमट्टी धरण, कोयना धरणाबाबत सविस्तर शासनाला अहवाल दिला जाईल. महापुरासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापून यासाठी शासनावर दबाव निर्माण करू आणि शहर विकासाचा लढा उभारू, असे आवाहन केले.