शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीची रेकॉर्ड ब्रेक वसुली

By admin | Updated: October 7, 2016 00:05 IST

महापालिका : एका दिवसात ९० लाख जमा; गतवर्षीपेक्षा दुप्पट जमा

 सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने गुरुवारी एका दिवसात ९० लाखांची वसुली करीत रेकॉर्ड केले. गेल्या चार दिवसात तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली झाल्याचे सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, गतवर्षीपेक्षा सप्टेंबरअखेर घरपट्टी विभागाने दुप्पट वसुली केली असून आजअखेर १४ कोटीचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर वसुलीवर भर दिला आहे. विशेषत: गेल्या काही वर्षापासून थकबाकी असलेल्या कराच्या वसुलीबाबत आयुक्तांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. घरपट्टी विभागाचे प्रमुख रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने कर वसुलीची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी विभागाकडे ३७ कोटीची थकबाकी आहे. आजअखेर या थकबाकीपैकी १० ते साडेदहा कोटीची वसुली झाली आहे. चालू घरपट्टीची बिलेही मालमत्ता धारकांना देण्यात आली आहेत. त्यातून चार कोटी वसूल झाले आहेत. आतापर्यंत १४ कोटीची वसुली झाली आहे. गतवर्षी सप्टेंबरचा वसुलीचा आकडा ६ कोटी ४१ लाख रुपये होता. यंदाची वसुली पाहता, गतवर्षीच्या तुलनेत ती दुप्पट आहे. याबाबत रमेश वाघमारे म्हणाले की, यंदा घरपट्टी विभागाला चालू व थकीत कराचे ७० कोटीच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ६० कोटीची वसुली आम्ही मार्चअखेरपर्यंत करू. थकबाकी वसुलीवर आमचा भर असून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. गुरुवारी एका दिवसात ८७ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यापुढेही ही मोहीम गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सांगितली. (प्रतिनिधी)आॅनलाईन कर भरणा सुविधा देणारमहापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टीची बिले आॅनलाईन भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संगणक विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा शुक्रवारी उघडल्या जाणार आहेत. येत्या दोन महिन्यात ही सुविधा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.