शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

तासगावमध्ये बेदाण्याचा विक्रम

By admin | Updated: August 5, 2014 00:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा : किलोला ४५१ रुपये दर, आजवरचा सर्वाधिक भाव

तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सोमवारच्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्याला उच्चांकी ४५१ रुपये दर मिळाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. सदाशिव महादेव माळी (रा. खरशिंग) या उत्पादकाचा हा बेदाणा आहे. या दराने त्यांच्या ३१५ किलो बेदाण्याची आज विक्री झाली.गेल्या महिन्याभरापासून बेदाण्याच्या दरात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक आठवड्यात दराचे नवे विक्रम होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी ४0१ रुपये दराने बेदाणा विक्री झाली होती. आज ४५१ रुपये सर्वात जास्त दर मिळाला. सोमनाथ ट्रेडर्स या दुकानात झालेल्या सौद्यात ४५१ रुपये दराने रोहिणी ट्रेडिंग कंपनी यांनी हा बेदाणा खरेदी केला.आजच्या सौद्यात एकूण ५२0 टन बेदाण्याची आवक झाली होती. यापैकी ४४0 टन बेदाण्याची विक्री झाली. हिरव्या बेदाण्यास १९0 ते ४५१, पिवळ्या बेदाण्यास १६२ ते २२0, तर काळ्या बेदाण्यास ५५ ते ९५ असे सरासरी दर मिळाले. याच आठवड्यात २ आॅगस्ट रोजी (शनिवारी) निघालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्याला किलोला उच्चांकी ४०१ रुपये दर मिळाला होता. तासगावातील बेदाणा उत्पादक जालिंदर जगताप यांच्या ३५0 किलो बेदाण्याची या दराने विक्री झाली होती. बाजार समितीमधील श्रीनिवास ट्रेडर्स या दुकानातील बेदाणा सौद्यात ४०१ रुपये उच्चांकी दर देऊन हा ३५० किलो बेदाणा खरेदी केला होता. बेदाण्याचा हा नवीन उच्चांक झाल्याने बेदाणा पाहण्यास व्यापारी तसेच खरेदीदारांनीही गर्दी केली होती. आता हा विक्रमही आज मोडीत निघाला. गेल्या महिन्याभरात बेदाण्याला चांगला दर मिळत असून, ३७०, ३९० या उच्चांकी दराचे विक्रम मोडत आज पहिल्यांदाच बेदाण्याने ४५0 रुपयांचा टप्पा पार केला. तासगावातील बेदाणा सौद्यात बेदाण्याला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांनी बेदाणा उत्पादकांनी खासगी पद्धतीने बेदाणा विक्री करु नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अनिल पाटील व सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. (वार्ताहर)